*रुसवा, फुगवा, हट्ट? चांगला असतो!*
ज्या दिवशी मी ट्रेकिंग (“to go on a long arduous journey, typically on foot”.) ला गेलो होतो त्या दिवशी 'बाईसाहेब' नाराज होत्या. रामशेज किल्ल्यावरून परत आल्यावर आनाहताने माझी 'चौकशी' सुद्धा केली नाही. मी ही नाही बोललो. पण दोनतासांनी बाईसाहेब माझ्या जवळ आल्या अन विचारलं 'मला का नाही नेलं'. मी म्हणालो 'तुझी परीक्षा सुरु आहे, म्हणून'. यावर तीम्हणाली 'परीक्षा झाल्यावर नक्की'. मी 'हो' म्हणालो.
परीक्षा झाल्याबरोबर तिने फोन केला - 'बाबा कधी?'. मी म्हणालो 'उद्या'. 'किल्ल्यावर बरका' तिची सूचना. मी म्हणालो 'बघू'. तिलासंशय आला माझ्या 'बघू' मुळे. मग मी तिला सांगितलं 'आपण चामर किल्ल्यावर जाऊ'. तिला 'रामशेज किल्ला जड गेला असता' - असं मला वाटलं.
सकाळी सकाळी ती खूप उल्हसित होती. हे पाहून उल्काला व मलाही उत्साह आला. मी चामार लेणी ठरवली कारण घरापासून दहाकिलोमीटरवर असलेली 'जैन लेणी' मी आजपर्यंत पाहिली नव्हती. होतं असं कधीकधी. आम्हीं तिघंही म्हसरूळ वरून डोंगरापर्यंतपोहचलो. आज आनाहता खूप आनंदात होती. She was receiving exclusive attention. She was center of our attraction. This made the difference to her happiness. आम्हीं डोंगर चढायला सुरवात केली. मी चित्रीकरण करत होतो. जैन मंदिरापर्यंत पोहचलो. नंतर लेण्यांकडे जाणारी अशी एकदम छोटी आणि किंचित अवघड वाट सुरु झाली. उल्का थांबली. मीअनाहताला 'प्रोत्साहन' दिले. 'भीती वाटली तरी चढायचं. मी आहे मागे. तू मस्त चढत आहे' - असं सांगितलं. जवळ जवळ आम्हीं पाचशेमीटर वर गेलो असू. तिला आत्ता 'अवघड' वाटू लागलं - मी विचारलं 'अजून जायचं का पुढे?'. ती म्हणाली 'थोडं जाऊ आणि मगमाघारी फिरू.'
*तिच्या तालावर मी आज नाचत होतो. तिच्या मनात काय होतं कोण जाणे? ती आजीला म्हणाली 'माझं कौतुक कर ना!'. मग आजीनेबाईसाहेबांना पोटाशी धरलं आणि कौतुकवर्षाव केला. आम्हीं खाली आल्यावर अनाहता म्हणते 'बाबा तुम्हीं मला फसवलं. मी सांगितलंहोतं कि मला किल्ल्यावर घेऊन चला. तुम्हीं मला लेण्यांवर घेऊन आला. मला आताच्या आत्ता किल्ल्यावर घेऊन चला'. नवीन प्रसंगाशी'तोंड' देतांना आमच्या नाकात दम आला होता.*
मग मी परत 'प्रॉमिस' केलं. पुढच्या आठवड्यात जाऊ. आज मी अन उल्काने 'quality time' दिला. आम्हांला दोघांनाही 'संस्कार' केल्याचा आनंद मिळाला.
*मी मनातला विचार बोलून नाही दाखवला. २०२३च्या उन्हाळ्यात यांना हिमाचल प्रदेश मध्ये ट्रेकिंगला जाईन म्हणतो. माझे पाय जोपर्यंत थकत नाही तो पर्यंत यांच्यावर 'निसर्ग संस्कार' आम्हीं केलेच पाहिजे आणि आमचा स्वार्थ - निखळ आनंद - हा साधलाचपाहिजे.*
ट्रेकिंग क्लिप बघा - exclusive attention ची. तुम्हीं सुद्धा ट्राय करा.
Post a Comment