*(पाकिस्तानी की) भारतीय 'मंटो'*
केवळ सुहासने सुचवले म्हणून मी 'मंटो' या लेखकावर आधारित दोन चित्रपट बॅक टू बॅक बघितले. पहिला पाकिस्तानी चित्रपट सर्मदखूसाद यांनी दिग्दर्शित केला तर दुसरा भारतीय दिग्दर्शक नंदिता दास यांनी. नंतर गप्पा मारतांना मी सुहासला सांगितलं - मी दोन्हींचित्रपट पाहिले. मज्जा आली. दुसरा बघितल्यावर 'मंटो' - वादग्रस्त लेखक - जरा जास्त समजला'. या वर सुहास विचारता झाला - कोणता जास्त आवडला? या प्रश्नाला मी प्रदीर्घ उत्तर दिले - उभ्या उभ्या - कारण सुहास हा उत्तम रसिक आहे आणि आम्हीं 'वरच्या वेव्हलेंथ' वर संवाद साधू शकतो.
*मी म्हणालो 'सुहृद सुहास, इंडस नदीने कसा अविष्कार करावा हे ब्रह्मपुत्रेनं सांगू नये आणि 'व्हाइस वर्सा'. किंवा पिकोसाच्या चित्रांचीतुलना व्हॅन गॉग च्या चित्रांशी करू नये. समीक्षा झाली पाहिजे - तुलना नाही. कारण कोणतीही कलाकृती हा 'स्वतंत्र अविष्कार' आहे - कलाकाराचा परिप्रेक्ष्य, दृष्टिकोन हा खूप वेगळा असू शकतो - विषय जरी एक असला तरी. तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे - मला दोनीहीचित्रपट भावले. आवडले. उगीच तुलना करून 'रसभंग' व्हायला नको*. सुहासला उत्तर पटलं असावं कारण त्याने सुद्धा एकाच विषयावरअनेक सिनेमे बघितले आहे.
खरंतर विषय संपला होता तरीही मी सुहासचा प्रश्नावर विचार करत होतो. समीक्षा तर झालीच पाहिजे जेणेकरून रसग्रहण केल्याचंसमाधान होईल. समीक्षा म्हणजे केवळ टीका नव्हे. टीके मध्ये एक नकारात्मक सूर असतो. बरेचसे दोष दिग्दर्शनच असते. म्हणूनचित्रपट समीक्षकेत सर्जनशीलता असायला हवी - सकारात्मकता हवी. म्हणजे दोन्हीं चित्रपटात 'चांगले', 'वेगळे' काय होते हे सांगणे.
*पाकिस्तानी 'मंटो' त लेखक कोणत्या 'मानसिकतेतून' जात असतो याचा अप्रतिम उहापोह केला आहे. 'गोष्ट लिहिणं अन सांगणं' हेकिती त्रासदायक असतं हे समजतं / उमजतं. (येथे मला संजय दत्त आणि ऐश्वर्या यांचा 'शब्द ' सिनेमा आठवला.) या सिनेमात'नूरजहाँ' फार सुंदर रेखाटली आहे. तिचा अदब आणि लकब - वा क्या बात है. उर्दूचा वापर अत्यंत चपखल आहे - संपूर्ण सिनेमा हापाकिस्तानात घडत आहे.*
भारतीय 'मंटो' हा नंदिता दास यांनी रंगवला आहे. तांत्रिक दृष्ट्या अतिशय उत्तम. मंटो यांचा प्रवास - हिंदुस्तानातून पाकिस्तानातदाखवला आहे. पण नंदिताने 'नुसती' कथा सांगितली. मंटो चं अंतरंग नाही रंगवलं. त्या ऐवजी मंटो चा सर्वात गाजलेला खटला उत्तमप्रकारे दाखवला. अगदी 'अर्ग्युमेण्ट' सहित. (https://youtu.be/DAF7qSgjUW4) मंटो यांनी हिंदुस्थान का सोडला याचीकारणमीमांसा खूप उत्तम केली आहे.
म्हणून म्हणतो, मला दोनीही चित्रपट आवडले. चित्रपट 'संपल्यावर' प्रत्येक रसिकाने (?) स्वतःला विचारलं पाहिजे - हा चित्रपट मलाका आवडला. असो.
https://youtu.be/7iMUh8mWB20 - पाकिस्तानी मंटो.
Post a Comment