(भारतीय की ) पाकिस्तानी 'मंटो' ?
आयुष्य नेहमी सरळ रेषेत नसतं ( कोणी म्हणेल - म्हणून तर मजा आहे ). सर्जनशील कलाकाराचं तर नसतंच नसतं. त्यातून 'समाजाचा' कॅनव्हास बदलला तर? तर ते वेगवेगळ्या (भयावह) रंगानी आणि रेषांनी भरून जातं. कलाकाराने जर देश बदलला तर 'वेदनाच वेदना'. हेलिहीत असतांना मला 'चित्रकार अमृता शेरगील' आठवत आहे. जर कलाकाराला एखादं व्यसन असेल तर .... शोकांतिका अटळअसते.
नुकताच मी तीन तास चोपन्न मिनिटांचा 'मंटो' हा पाकिस्तानी सिनेमा बघितला. ( https://youtu.be/7iMUh8mWB20 ) सुन्नझालो. साहित्य निर्मिती होतांना ज्या वेदना होतात त्याची किंचित अनुभूती घेतली. कोण आहे 'मंटो'? काही व्यक्तिमत्वांनी भारत आणिपाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आपली छाप सोडली. त्यातलेच एक आहेत सादत हसन मंटो - कथाकार!
मंटो सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष, त्याची गरिबी, दारिद्र्य, असाहय्यता तटस्थपणे मांडतात... मंटो हा स्वातंत्र्य चळवळीच्याकाळातला प्रसिद्ध लेखक होता. त्याचं लेखन प्रामुख्यानं समाजाच्या अंधाऱ्या अन उघडपणे असभ्य समजल्या जाणाऱ्या लोकांविषयीहोतं. वास्तववादी होतं. त्याच्यावर सहा खटले सुद्धा भरले होते पण तो त्यातून सुटला होता. त्याच्या कथेतील 'पात्र' त्याला सारखे त्रासद्यायचे - जो पर्यंत तो कथा लिहीत नसे तोपर्यंय. मनात येईल तेंव्हाच लिहीन असा अट्टाहास करणारा लेखक खूप दारू प्यायचा. कथाप्रसूत होतांना त्याला त्रास व्हायचा. तो 'मानसिक आरोग्याचा' शिकार झाला होता का? फाळणी नंतर त्याला मुंबई सोडून पाकिस्तानातजावं लागलं - यामुळे त्याच्या कलाकारीत फरक पडला का ? पाकिस्तानातील 'कम्युनिस्टांनी' त्याचा छळ केला का? गायिका नूरजहाँआणि त्याचे ..... अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या सिनेमात 'किंचित' मिळतात. मी फार पूर्वी त्यांच्या कथा वाचल्या होत्या त्यामुळेलेखकाची 'शोकांतिका' बघितल्यावर मी सुन्न झालो होतो. सिनेमात उर्दू चा खूप वापर असल्याने कधीकधी सिनेमा समजत नाही. मंटोसमजून घेणे म्हणजे जीवन समजून घेण्यासारखे आहे. मंटो समजण्यासाठी त्यांचे लिखाण वाचणे आवश्यक आहे आणि ते वाचल्यानंतरमंटो आपोआपच तुमच्या मनावर गारूड करतो. मंटो यांनी आयुष्यभर प्रखर वास्तव मांडणा-या कथा लिहिल्या. सत्याचे दुसरे नावच मंटोआहे. हा पाकिस्तानी सिनेमा त्याची कथा आहे.
२८/१०/१९५१ रोजी सआदत हसन मंटो म्हणाले होते की, मी चालती-बोलती मुंबई आहे. मंटोंचे मुंबईशी जुने नाते होते. तेथील वास्तव्यातत्यांनी अनेक प्रसिद्ध कथा लिहिल्या. मंटो यांनी आपले एक चतुर्थांश आयुष्य मुंबईत घालवले. ते १९३७ मध्ये मुंबईत आले १९४८ पर्यंतते येथे राहिले आणि नंतर पाकिस्तानात निघून गेले. तेथे आयुष्यातील अखेरची काही खळबळजनक वर्षे त्यांनी घालवली.
*नंदिता दास यांनी सुद्धा 'मंटो' वर सिनेमा तयार केला आहे. तो आता बघतो. (https://youtu.be/DAF7qSgjUW4) - लिंक चेककरा. नंदिता दास म्हणते - मंटो फिल्म में मुझे जो मिला वो एक फिल्म निर्देशक की आधी-अधूरी ‘रिसर्च’ थी, वर्षों से सोशल मीडियाकी खूंटी पर टंगे हुए मंटो के चीथड़े थे और इन सबसे कहीं ज़्यादा स्त्रीवाद बल्कि ‘फेमिनिज़्म’ का इश्तिहार था.*
*तुम्हीं हे सिनेमे पहा. एकाच विषयावर दोन सिनेमे - दृष्टिकोन - पहा.*
Post a Comment