At 62

*'गोष्टी सांगणारा पांथस्थ'*


अंगठ्या शेजारचं बोट आज प्रचंड दुखत आहेतरी बरं मी AI - आर्टीफिशिअल इंटीलिजन्स - कृत्रिम प्रज्ञा चा वापर केलाकॉपी/पेस्टझालं काय - काल माझा वाढदिवस होतामाणूस कलेकलेने  वाढता वर्षातून एकदा वाढतो असं वाटतंवाढदिवसाच्या दिवशी - फेसबुक नावाच्या समुद्राला भरती येते आणि वॉल भरून जातेव्हाट्सअप नावाच्या नदीला महापूर येतोतर 'प्रत्यक्ष संभाषणहा एकझरा आहेया ओहोळाला अचानक पाणी येते.


फेसबुक एक समुद्र आहे समुद्रातलं पाणी तिथेच असल्याने रात्री ११.५९ मिनिटांनी एक यांत्रिक पोस्ट टाकली तरी चालतं अन सर्व FB मित्रांना 'पोच पावतीदिल्याचं समाधान मिळतंमित्र सुद्धा पोचपावतीची वाट बघत असतात असंही नाहीया प्रकारात 'यांत्रिक - समाधान (?)' मिळतंडिजिटल युगात 'असे समाधानकिती समाधान देते हा संशोधनाचा विषय आहेदेणारा 'देऊन मोकळा होतो', तरघेणारा 'en masse ( अर्थ -एकाच वेळीगठ्ठ्याने ) पावती देऊन 'मोकळाहोतोप्राप्त परिस्थिती अशी आहेपण नाइलाज आहेसातासमुद्राकडून येणाऱ्या शुभेच्छा सुद्धा आपण घेत राहतो


व्हाट्सअप मात्र 'नदी आहे'. वाढदिवसाच्या दिनी तिला पूर येतोयेथे थोडी तरी 'संवेदना / भावनाअसते हे नक्कीयांत्रिक शुभेच्छाव्यतिरिक्त काही लोक जरा जास्त व्यक्त होतातयेथे मज्जा येतेआज बहुसंख्यानी अपेक्षा व्यक्त केली - 'आज नवीन काय वाचायलापाठवणार?'. पण का कुणास ठाऊक - मी गप्प राहायचं ठरवलं. *एक लक्षात येतंय की 'माझी आठवण 'गोष्टी सांगणारा - पांथस्थमानकरअशी रुजत चालली आहे.* तरुण वयात (वय ३५एका मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये 'आम्हांला आमची श्रद्धांजली लिहायलासांगितली होती'. श्रद्धांजली देतांना 'गेलेला माणूस आठवणीरुपी कसा मागे राहिला आहेयावर बोललं जातंमी काहीबाही लिहिलंहोतंआज ते आठवलंस्वतःकडे बघितलं आणि 'शुद्ध हसलो' - किती चुकीचं लिहिलं होतं म्हणूनआणि आज प्रत्यक्षात 'स्टोरी टेलर - मानकर ' - never thought of. *प्रत्येकाला मी इथे नसल्यावर लोकांना माझी आठवण राहील काअसा प्रश्न पडलेला असतो.*  असोआज मी प्रत्येक व्हाट्सअप ला पोचपावती दिली - *आपण 'या निमित्तानेव्यक्त झाला अन माझ्यासाठी चिंतन केले - याबद्दलखूपखूप आभार*. म्हणून बोट दुखत आहे


काहींनी मात्र फोन केलामुद्दाम फोन केलाआम्हीं बोललोजिवंत झरा वाहू लागलाआठवणी फेर धरून नाचू लागल्यावह्यांची पानं'फडफडूलागलीचांगल्या आणि वाईट आठवणींचे तरंग मनाच्या भूपृष्ठावर उमटू लागलेनावगावभावनांचे कड जसेच्या तसेअंगावर उभारलेमन आणि शरीर 'शहारलं'. ज्यांनी ज्यांनी फोन केले - त्यांच्याशी असलेल्या समंधाविषयीची (संयोगसंसर्गनातेंयोगधागादोराउजळणी झालीओहोळांमधून पाणी वाहून गेलं तरी झरा 'आटलानव्हताझरा 'जिवंतहोता म्हणून फोन - 'उदंडआयुष्य लाभोएव्हढंच सांगण्यासाठीइथे 'मानकरने मला फोन केला नाही मग मी करणार नाहीअसा संकुचितपणा नव्हताआयुष्यसुंदर आहे ते इथे जाणवलं.


लिहिण्यासाठी काल 'आतूनकाहीही येत नव्हतंशांतता हवी होती. 'आतबघितलं तर 'खूप समृद्ध जगलोहे समाधान होतंपुढच्यापोकळीत बघितलं तर हुरहूर उमटलीपण क्षणभरचकारण लगेच बकेट लिस्ट समोर दिसली - अन लगेच दिलासा मिळालाअरेमाझ्याकडे तर वेळचं नाहीआपलं आयुष्य तर दवबिंदूंसारखं आहेउत्पत्ती - स्थिती - लयतेही पटापटमैत्रीण प्रज्ञा पालवे हिच्याकवितेत फेरफार केले ते तुमच्या समोर मांडतो


*आयुष्याच्या पानावरची

अलवार नक्षी दवबिंदूंची 

वाऱ्यावर आयुष्य झुले 

वर खाली चा झोका खेळे 

क्षणभंगुर जीवनाचा

क्षण अन क्षण उपभोगणारा 

आपल्याच मस्तीत खुशाल रहाणारा 

खुशालचेंडू, 'दवबिंदूसारखा'.*


'तोच तोचपणा टाळण्यासाठीसुनेला सांगितलं 'केकवैगरे काही नाहीफक्त औक्षण करतिने ते ऐकलंआहोबोलता बोलता ६२ वर्षेसरली





 

0/Post a Comment/Comments