*दिंडी : @सूक्ष्म - MICRO level ?!*
- संपूर्ण दिंडीचं संक्रमण हे 'नशेत' चालते. पहिली नशा विठ्ठलाची तर दुसरी नशा 'तंबाखूची'. नव्वद टक्के वारकरी सकाळीउठल्यापासून ते झोपेपर्यंत तंबाखूच्या नशेत पुढे चालत असतात. कुठेही थुंकणं - हा त्यांचा हक्क आहे.
- दिंडीतील वारकरी केव्हांही 'दिंडी मार्गावर' पाय ठेवतो तेंव्हा नतमस्तक होतो, रस्त्यास स्पर्श करतो. पाहिलं पाऊल टाकलं की'गिरकी' मारतो अन मग पुढचं पाऊल टाकतो.
- दिंडी मध्ये स्वतःचं ताट वारकरी स्वतः धुतो. ताट धुतल्यावर त्याच ताटात पाणी घ्यायचं आणि प्यायचं. दिंडीत ग्लास वापरतनाही.
- प्रत्येक दिंडीत 'भजनी मंडळ' असते. टाळकरी, पखवाज वाजवणारा आणि भजन म्हणणारा महाराज. हे तिघं चौघं दिंडीलासातत्याने ऊर्जा देत असतात. यांना वगळलं तर ...... कल्पना करणं अशक्य.
- प्रत्येक पुरुष आणि महिला माऊलींची ' अंघोळ' करणं ही मानसिक गरज आहे. तो दिवसभर अस्वच्छतेच्या 'गर्क्यात' असतो .... कुठेही झोपतो, कसाही झोपतो.
- दिंडी हा काहीजणांचा व्यवसाय आहे. प्रत्येक दिंडीला मालक असतो. तोच दिंडी 'चालवतो'. दिंडीचे 'नियोजन' पाच महिनेचाललेले असते. दिंडी 'चालवणे' हे प्रचंड जबाबदारीचे काम असते आणि त्याने दिलेल्या सेवेचा त्याला आर्थिक 'मोबदला' मिळतो.
- वारकरी तसा शांत अन मनमिळाऊ असतो. पण काही 'नव्हखे' असतात अन त्यांना बेसिक वर्तन कसे असावे याची जाण नसते. उदा. रात्री बारा एक पर्यंत मोठ्याने गप्पा मारणे.
- आमच्या दिंडीची रेटेड कॅपॅसिटी २५० लोकांची आहे. पण दिंडीत राबता मात्र जवळपास ४०० लोकांचा असतो. 'आओ जाओ - घर तुम्हारा ' असं उदारमतवादी धोरण मालकाचं. लोक येतात. जेवतात. झोपतात. अन निघून जातात. हे येणं अन जाणं बऱ्याचवेळा मालकाला माहित नसतं. पण अन्न कधीही कमी पडत नाही. झोपायला मात्र गर्दी होते. मालक बळीराम मला म्हणायचा - जाऊद्याहो मानकर, काही कमी पडणार नाही. बऱ्याच वेळा दोन तीन दिवस राहणारे पैसेही देत नाही. त्यांना त्याचं काही वाटतहीनाही.
- दिंडी मध्ये कोणी कोणाला कंट्रोल करत नाही. तरीही सगळं वेळेवर पार पडत असतं. न सांगता लोक मदत करत असतात. दिंडीमधील दहा बारा माऊल्या दररोज भाकऱ्या थापायच्या. वाढणारे कमी दिसले की मी पात्र हातात घ्यायचो.
- बहुसंख्य लोक आर्थिक दृष्टया अत्यंत गरीब होते. तंबाखू व्यतिरिक्त एकही वस्तू ते विकत घेऊ शकत नव्हते. थोड्याश्या गप्पामारल्या की जखमा वाहू लागतात. कोण कोणत्या मनस्थितीतून दिंडी करत आहे हे समजत नाही.
- आणि बरंच काही ... सुखावणारं, दुःखाचे चटके देणारं ....
*थोडक्यात पण अतिमहत्वाचं सांगतो - मी आणि इतर सर्व लोक एकच आहोत. आमच्यातील मूळ भाव एकच. पण व्यक्त अविष्कारअनेक. गोरे काळे किंवा सामाजिक / आर्थिक असमानता ... ही भिन्नता निसर्गाने दिली आहे. पण न्यूनता माणसाने निर्माण केली आहे. श्रेष्ठ आणि कनिष्ट हे भेद आदिम भावनांनी केले. ह्या संकुचित भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी मी दिंडीत प्रवेश केला. इतरांचा स्वीकारकरण्यासाठी - हे उस्मानाबादेवरून आलेले आहेत .... ईश्वरी अंश !*
Post a Comment