*उल्काची 'आवड' कि 'अट्टाहास'*
'तीव्र भावना (भय प्रीती इ), उत्कट भावनेचा उद्रेक' हा passion शब्दाचा अर्थ आहे. याचा मी नुकताच अनुभव घेतला. नवीन काहीशिकण्याची 'आवड' तरुणांमध्ये असावी अशी अपेक्षा. उल्का अजूनही 'तरुण' आहे - कारण काही नवं शिकण्याचा 'अट्टाहास'. वर्षभरापूर्वी तिने 'फ्रेंच' चे धडे घेतले तर एक महिन्यापासून ती 'संस्कृत' शिकत आहे. प्रचंड आनंद ही 'तरुणी' मिळवत आहे - अर्थातमहत्प्रयासाने. 'काहीही फायदा नसेल तर कशाला शिका?' असा विचार नाही. आजही तिचा एक टप्पा संपला आणि मग तिने 'संस्कृतशिकणे - अनुभव आणि फायदे ' ग्रुपला सांगितले - संस्कृतमध्ये. स्पष्ट उच्चार हे 'संस्कृत' मध्ये महत्वाचे - जिभेला 'वळण' लावणंखूप अवघड. हल्ली आपण मराठी सुद्धा नीट बोलत नाही. निश्चित च्या ऐवजी रेडिओवर 'निचित' ऐकावे लागते. हल्ली 'माणूस भेटतो' अन 'वस्तू सुद्धा भेटते' - वस्तू मिळत असते हे आपल्याला माहित नाही.
*उल्काचे भाषण आवर्जून ऐका. Motivate व्हा म्हणजे प्रेरणा मिळवा. Encourage करा - इतरांना प्रोत्साहित करा. ऑनलाईन वर हेफुकट आहे. दररोजच्या डेटा चा .... उपयोग .... सत्कार्यासाठी करा. आनंद तर मिळवाचं. पण समाधान - दीर्घ कालीन पण शोधा.*
याजसाठी केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥
*आपण जर जीवापाड मेहनत घेतली तर भागवत्प्राप्ती ही दूर नाही हेच कळते. आपणही सगळ्यांनी अट्टाहास करावा आणि शेवटचादिवस गोड व्हावा हीच प्रार्थना!*
Post a Comment