*चलो गोंदेश्वर! आज 'वारी' फुकट आहे....*
आज फार धमाल आली. म टा च्या हेरिटेज वॉक साठी येणाऱ्यांसाठी सिटीलिंक महानगरपालिकेच्या बस व्यवस्थापनाने आणि म टायांनी 'दिवसाचा पास' गिफ्ट दिला. रात्री बारावाजेपर्यंत सिटी लिंक बसने कोठेही फिरा असंही सांगितलं. माझ्यातला कॉस्ट अकाउंटंटजागा झाला. सायखेडा ट्रिप दुपारी चार वाजता संपली. आम्हीं नासिकला परतलो होतो. आमच्याकडे अजून चार पाच तास होते - उंडारण्यासाठी. मग मी गिफ्ट ऑप्टिमायझेशन करायचे ठरवले. सिटी लिंक ची बस जास्तीत जास्त किती लांब जाते ? चौकशी अंतीकळलं की - बस सिन्नरला जाते.
लगेच ठरलं 'सिन्नरला जायचे आणि गोन्देश्वर बघायचे.' मी, उल्का, मंजुषा पाटील आणि आशिष असे निघालो - अन गोंदेश्वरबघितले.
*हे मंदिर पुरातन (भूमिज स्थापत्यशैली) बांधकामाचा उत्तम नमुना आहे. कुणी याला हेमाडपंथी शैलीही म्हणतात. मंदिर १२ व्या शतकातगवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. 'सेउना’ म्हणजेच यादव घराण्यातील राजगोविंद हा राजा. ‘सेउनाचंद्र’ या राजानेवसविलेले ‘सेउनापुरा’ म्हणजेच सिन्नर. खिलजीच्या आक्रमणामुळे ह्या राजवटीची वाताहत झाली. काळ्या बेसाल्टमध्ये बांधलेले हेमंदिर अजूनही खुपसे सुस्थितीत आहे.*
माझं आजोळ सिन्नरचे. या गोंदेश्वराला आम्हीं खेळायला जात असू. तेव्हां ते गावाबाहेर वाटायचे. आता ते गावात आले. सिन्नरच्यामोठ्या गणपतीच्या मांडीवर बसायची इच्छा होती लहानपणी. तेंव्हा तेथील चिंचबन अजूनही आठवते. अन त्या वेशी.
एकंदरीत पास 'वसूल' झाला. खूप फोटो काढले. सिटी लिंक - आभार. सर्व कर्मचारी वृंद चांगला आहे. प्रवासी आनंदात असतातकारण कर्मचारी चांगली माहिती देतात. सिटिलीन्क चा शेवटचा स्टॉप पासून गोंदेश्वर एका फर्लांगावर आहे. पायी जा. आधी दुरून मंदिरबघा. आणि नंतर आतून. शुभस्य शीघ्रम. नासिक - सिन्नर - नासिक - भाडे रुपये १०८. अजून काही माहिती हवी असल्यास ....... मैं हूंना !
खूप सुंदर लेखन , सर जी
ReplyDeleteअतिशय सुंदर व्हीडिओ आणि तेवढेच समर्पक संगीत
ReplyDeletePost a Comment