*सायखेळिया* - सायखेडा
कोणत्याही भग्न वास्तूत जातांना माझं मन गलबलेलं असतं. ज्या पडलेल्या वास्तूत मी शिरत असतो ती वास्तू एके काळी किती'दिमाखात' उभी असेल याची मी कल्पना करत असतो. सीरिया आणि जॉर्डन येथील रोमन अँपी थिएटर बघतांना मी कल्पनेनं ग्रीकआणि रोमन नाटकं बघू शकतो. त्या पायऱ्यांवर रोमन कसे बसले असतील हे मी बघतो तर नाट्यकर्मीने विंगेतून कधी प्रवेश केला असेलहे मी ताडतो. माझा मनःचक्षु फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतो. मी चिंतनात तत्काळ गढून जातो.
*आजही मी सायखेड्यात एका भग्न 'नाट्यगृहासमोर' उभा होतो. बाहेरून अवस्था न्याहाळत असतांना उल्का घाईघाईने बाहेर आलीआणि म्हणाली 'लवकर आत या, पांढरं घुबड बसलं आहे'. प्राचीन ग्रीकांमध्ये, बुद्धीची देवी, अथेन, घुबडांच्या रूपात पृथ्वीवर आली असेम्हणतात. भारतीय पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले गेले आहे की घुबड म्हणजे श्रीमंतीची देवता लक्ष्मी यांचे वाहन आहे. हिंदूसंस्कृतीत घुबड समृद्धी आणि संपत्ती आणते असे मानले जाते.*
मी आत जाईपर्यंत ते उडून गेलं. येथील लक्ष्मी आणि सरस्वती - दोघीही उडून गेल्या. राहिलं काय तर - दारं अन खिडक्या. धुळीचंसाम्राज्य. या भग्नावस्तेत मी कठपुतळ्यांचा खेळ बघत होतो. हे गाव त्या करीता प्रसिद्ध आहे. लहान मुले पुढच्या 'हौदात' बसलीअसतील तर पुरुष माणसं जरा उंचीवर बाजूला. महिला मात्र पहिल्या मजल्यावर असणार. नाटक चालू असेल तेव्हां तेव्हां महिलांनाविंगेत काय चालले आहे ते सुद्धा दिसत असेल.
*आणि हो. तिकिटाचं सांगायचं राहिलं. तिकीट एक रुपया - फर्स्ट क्लास , पन्नास पैसे - अप्पर स्टॉल.*
मी व्याकुळ झालो होतो. समृद्धीचा ह्रास बघतांना. पुढच्या आठ दहा वर्षात नाट्यगृह 'जमीनदोस्त' झालेलं असेल. यापुढील म टा हेरिटेजवॉक मध्ये 'हे' स्थळ नसणार. मी क्षणभर थांबलो. वास्तूला श्रद्धांजली दिली आणि बाहेर पडलो. संस्कृतीचा ह्रास बघत आहे. मी पूर्वीतमाशे बघितलेला माणूस आहे, वणीच्या यात्रेत. किंवा 'जॅकसन गार्डन ( हल्लीचे शिवाजी उद्यान) येथे. पूर्वी तेथे ओपन एअर थिएटरहोते. तमाशा ही एक जिवंत कला आहे. रसिक फेटे कसे उडवतात हे पाहिलंय. सगळं संपत चाललंय की संपलं.
॥कालाय तस्मै नम:॥ - माणसाच्या सुखाच्या स्मृती काळ दरवळून सोडतो अन्तोच काळ दुःखावर हळूच फुंकर घालण्याचेही काम करतो. हे खरं आहे का ?
Post a Comment