*दिंडी : 'इंदु आत्या'*
*चार दिवसांपूर्वी*
तिची अन माझी नजरानजर झाली. मला एकदम माझी इंदुआत्या आठवली, माझ्या आजोळची. शांत. समाधानी. निरागस. सधन. सुसंस्कृत. मोठ्ठ कुंकू भाळावर असलेली. पन्नास वर्षांपूर्वीची चुलीच्या शेजारी बसलेली. फुंकणी हातात घेऊन फुंक मारणारी. सर्वांनाकप कप भर दूध देणारी.....
मागच्या जन्मात इंदुआत्या मोहाडीला होती तर या जन्मात ती 'मांडवी - विदर्भ' येथे असू शकते असा विचार मनात आला आणि तेथेचविरघळला.
*तीन दिवसांपूर्वी'*
आम्हीं सर्व विसाव्यासाठी थांबलो होतो. त्या रानात काटे खूप होते. म्हणून मी आणि राम चांगली जागा शोधू लागलो. थोड्याच अंतरावरचार पाच माऊल्या बसल्या होत्या तेथे गेलो. बघतो तर काय, माझ्या आत्यासारखी दिसणारी माउली तिच्या चार मैत्रिणींना घेऊनबसलेली होती. यापुढे त्या माउलीचे नाव 'इंदुआत्या' ठेऊ.
आम्हीं आमची बैठक त्यांच्या जवळ मांडली. माझ्याकडे एक गूण आहे. मी नबोलणाऱ्याला बोलतं करतो. ओळख पाळख नसेल तरी'प्रचंड गप्पा' मारू शकतो. विनोद करू शकतो. मुख्य म्हणजे माझ्याशी झालेली भेट 'सुंदर आठवणीत' वर्ग करू शकतो.
आजही तसंच झालं. मी, इंदुआत्या आणि मैत्रिणीबरोबर खूप गप्पा मारल्या. दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र एकत्र झाला. काय? कसे? कुठे? का? केंव्हा? होका? अरेरे? असे शब्द आम्हीं वाक्यात टाकून बऱ्याच गोष्टींचा उहापोह करत होतो. त्या बोलत असायच्या आणि मीऐकत असायचो. माझ्या एक लक्षात आलं की यांना लिहायला वाचायला येत नाही. 'तुम्हीं दांडीला का चालला? याचं उत्तर त्यांना देताआलं नाही. उत्तर महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय रुजलेला आहे. पिढ्यानपिढ्या तो मागून पुढे येत आहे. त्याचं ‘बौद्धिकीकरण’ कोणी करतनाही.
*एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः॥*
भावार्थ : जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो. भगवंत त्याचे कधीही वाईट होऊदेत नाही. आत्या आणि मी बोलू लागलो. दोन तास निघून गेले. पुढच्या प्रवासास सुरवात झाली.
*दोन दिवसांपूर्वी*
आम्हीं वाल्ह्या गावात पोहचलो. वाल्या कोळ्याचं हे गाव. दिंडी थांबली होती. एकेचाळीस तापमानातही उकळलेले पाणी पिण्यासटपरीवरच्या बाकड्यावर बसलो. या 'पांढरपेशा' कडे पाहून लोक सावरले. जो काळीमध्ये कसत नाही, म्हणजे जो शेतकरी नाही, तोपांढरपेशा. मी गप्पा सुरु केल्या आणि 'वाल्याचा वाल्मिक' येथे कसा झाला हे पुराव्यानिशी ऐकलं. मग मी दिंडीजवळ आलो - आमच्यामाणसांजवळ. आड रस्त्याला सर्व माऊल्या रस्त्यावर 'निजल्या' होत्या. मी माझा 'आत्ताचा' ब्लॉग खरडला. इकडे तिकडे बघितलं तरइंदुआत्या अधिक चार रस्त्यावर झोपल्या होत्या. मी जवळ गेलो. म्हटलं 'तुमचे मोबाइल नंबर द्या'. त्यावर त्या म्हणाल्या 'नंबर माहितनाही. हा मोबाईल घ्या अन शोधा. आम्हांला काय बी येत नाही'. मी चक्रावलो होतो. नाद सोडून दिला. मी म्हणालो 'कथा सांगू?'. कथाम्हटल्यावर त्या ताडकन उठल्या. मनोभावे माझी कथा ऐकली अन मलाच नमस्कार केला. प्रत्येक माउली दुसऱ्या माउलीला वाकूननमस्कार करते. इंदूत्त्याची मैत्रीण म्हणाली - लै भारी लिवलं. मी धन्य झालो. मी ही माझी पथारी आत्त्याजवळ लावली.
*आज*
मी सामान आवरून पटांगणात बसलो होतो. काल माऊलीची पालखी येथे होती. कोल्ह्या गावाची एरव्ही पाच हजार असते ती काल पाचलाख झाली होती. कीर्तन सुंदर झालं होतं. मी एकटा बसलेलं पाहून इंदूत्त्या जवळ आली. म्हणाली 'तब्बेत बरी नाही. ताप अन पडसंधरलंय'. मी विचारलं 'औषध घेतला का मग ?'. तर म्हणाली 'नाय. कोणाकडे मागावं हेच समजत नाही'. आत्याचा चेहरा मलूल झालाहोता. मी माझ्या कडची सर्व औषधें दिली अन म्हणालो 'आत्या काळजी घे. आत्ता मी दिंडी सोडतोय. मला बी ताप हाये. हा माझा नंबरघे अन नाशिकला ये. तुला राम दाखवतो.'
मग त्या चार पाच जणी आणि मी दिंडी मार्गापर्यंत आलो. प्रत्येक वारकरी रस्त्यावर पाहिलं पाऊल ठेवण्याआधी कृतज्ञता व्यक्तकरण्यासाठी रस्त्याला नमस्कार करतो, पाऊल ठेवतो, स्वतः भोवती गिरकी मारतो अन पांथस्त होतो. आम्हीं सर्वांनी तेच केलं. लालकुंकू असणारी इंदुआत्या अष्ट-गंध धारी विठ्ठलाकडे चालली होती. आणि मी दक्षिण काशीला.
आमचे डोळे पाणावले होते. डोळ्यात पाणी असलं की स्वच्छ दिसत नाही. आमची चार दिवसांची ताटातूट आम्हांला बघायची नव्हती. 'विठल्ला, ती आणि तिच्या मैत्रणी येत आहे. आता तू काळजी घे.'
पाठमोरी 'माझी' दिंडी. मनःपूर्वक नमस्कार केला आणि चालू लागलो.
Post a Comment