*चिनी (गुलाब)*
चिनी तसे नालायक, तर
चिनी गुलाब त्याहून नालायक !
चिनी 'छोटीशी' खोडी काढतात, तर
चिनी गुलाब 'मोट्ठी' खोडी काढतात !
चिनी जगावर 'ओरखडा' काढतात, तर
चिनी गुलाब माझ्यावर 'ओरखडा' काढतात.
चिनी कोव्हीड आला अन उशिरा गेला, तर
चिनी गुलाब आला अन लवकर गेला.
वृत्ती तीच, परिणाम आणि परिमाण वेगळे.
पण 'या' चिन्यांचं 'आपल्या' सारखं नाही !?
*’भिंत' त्यांनीच जपावी, 'आपण' नाही.
'संगीत' त्यांनीच जपावे, 'आपण' नाही.
'संग्रहालय' त्यांनीच उभारावे, 'आपण' नाही.
'शिस्तबद्ध' त्यांनीच रहावे, 'आपण' नाही.
'बागा' त्यांनीच सांभाळाव्या, 'आपण' नाही.*
चिनी 'हुकूमशाहीची' अपत्ये आहेत, तर
'आपण' भारतीय 'लोकशाहीची' अपत्ये आहोत.
चिनी 'शिस्तीला' तोड नाही, तर
आपल्या 'अराजकतेला' तोड नाही.
चिनी बोटाला 'शाई' लावतच नाही, तर
आपल्याला 'शाई' लावूनही फरक पडत नाही.
*चिन्यांना 'नालायक' म्हणून 'आपण' त्यांना पाताळात ढकलतो, पण 'आपण' पाताळातचं आहोत हेच विसरतो.*
संदर्भ - 'भिंत' the Great Wall of China 🇨🇳; ‘संगीत' the music of monasteries;
संग्रहालय various museums in China 🇨🇳; शिस्तबद्ध unique style of commutation by rail and road ; बागा the ancient gardens of China 🇨🇳; Google to know more.
Post a Comment