Startup 1975


 *स्टार्टअप १९७०-७५*


'साहेब दहा रुपयाला एकअसा भाव लिंबाचा ऐकून मी हवालदिल झालोयाच रविवार कारंज्याच्या बाजारात मी पंधरा दिवसांपूर्वी दहारुपयाला आठ लिंब आणली होतीआज घरातून निघतांना उल्का म्हणाली की लिंब कितीही महाग असली तरी आणायची कारणमहागाच्या औषधांपेक्षा 'ताजं लिंबूपरवडेलदुपारी बारा वाजेच्या सुमारास हा भाव ऐकून माझी तळ पायाची आग मस्तकात जाऊनपोहचलीमी दोन लिंबे घेतली आणि 'मेन रोडकडे नजर टाकलीनाशिकचा मेन रोड शुष्क आणि चेतनाहीन झालेला वाटलापर्णहीनझाडासारखानिस्तेजगर्दी नव्हतीमाणसं दिसत नव्हतीयाच मेनरोड वर लहानपणी आणि किंचित मोठेपणी ( म्हणजे कॉलेजमध्येअसतांनाफिरलो आहे हे आठवलंमनाच्या पटलावर ते दिवस दिसू लागलेलहानपणी सुरती कडून फरसाण आणणेपांडुरंग गोपाळकडून तेल आणणेबोहरपट्टीतून .... वैगरे अशी कामे मी १९७०-७५ च्या दरम्यान करत असे - हाफ चड्डीतनंतर कॉलेजला गेल्यावरकेसांची झुल्फ सांभाळीत आणि बेलबॉटमचा बॉटम फडकावीत १९७६-८० पर्यंतचे दिवस गेलेआज मेनरोडवर  उभं राहून मी हा माझामित्रांसमवेत 'इतिहासबघत होतो - चिंतन काहो हे ?


चौफेर मान वळवली आणि एव्हढ्या दुपारी एका  दुकानासमोर भली मोठी रांग लागलेली बघितलीलोकं निमूटपणे बाराच्या उन्हात रांगलावून 'अननस रस - थंडगार आइस्क्रिमच्या गोळ्यासहविकत घेत होतेगर्दी केली होती असं म्हटल्यास वावगं ठरू नयेमला काहीसमजायच्या आत मी आपसूकपणे रांगेत दाखल झालोयथावकाश चाळीस रुपये मोजून 'समर्थ जूस सेंटरचा अतिप्रसिद्ध 'अननसजूसघेतला अन दुकानातल्या 'बाकड्यावरबसलोपहिल्या घोटात थंड वाटलंमग तरंगत असलेला आईस्क्रिमचा गोळा हलकेचतोडला अन तोंडात टाकलागोळा विरघळत असतांना माझी मस्तकातील आग विरघळत होती - तिचं 'अर्थिंगहोत होतं आणि आग ... 


आग नाहीशी होत असतांना माझी ब्रम्हानंदी टाळी लागली असावी आणि मी १९७२-७५ मध्ये प्रवेश करता झालोयाच ठिकाणी त्याकाळी एकाने व्यवसाय सुरु केला होता - हल्ली त्याला आपण स्टार्टअप म्हणतोत्याने 'गाड्यावरदुकान थाटलं होतं - आणि तोअननसाचा रस विकायचादुधामध्ये किंचित पाणीअननसाचे बारीक बारीक तुकडे आणि त्यावर आईस्क्रिमचा गोळा असं ते 'रसकरणंहोतंगाडीवाल्याची अननसाचे बारीक तुकडे करणे हि क्रिया बघणीय असेपेल्यातील तो पिवळा द्रव म्हंजे स्वर्गसुखमलादादरचे मामा काणे आठवायचे - त्यांच्याकडील पिवळा 'पियुष'. एका वेळीस तो दहा ग्लासांचा 'लॉटतयार करीत असेत्यामुळे 'वाटबघणं अपरिहार्य - पण सुखावह'. रस 'एकजीवकरतांना तो दोन ग्लास लीलया वर खाली करायचा  म्हणजे जणू काही आपण रसाचीसर्कस बघतोय कि काय असं वाटायचंतल्लीन होऊन जाई तोत्याकाळी घाई कशाची नसायची मग मीभाऊमित्र मस्त टाइम पासकरायचोत्याकाळी 'बारा आणेम्हंजे पंचाहत्तर पैशास ग्लास मिळायचाआठवड्यातून एकदा 'पैसे जमवूनअननस रस पिणे ही एकचैन होती .... मजा होती ... बघता बघता गाडीवाल्याचा धंदा जोरात चालू झालागाडीसमोर गर्दी वाढू लागलीमहागाई वाढलीचारपाच वर्षात ग्लासची किंमत पाच रुपये झालीमला नौकरी लागली अन मी अननस रस आनंदाला पारखा झालो ... मेनरोडवर जाइनासाझालो .... काळकामवेग यामुळे मर्यादा खिशात पैसे असूनही अमृततुल्य रसाचे प्राशन करू शकत नव्हतो


आज बरोबर चाळीस वर्षांनी चाळीस रुपये देऊन तीच चव असलेला अननस जूस पीत आहेकाही 'चवीमनात रुतलेल्या असतातत्याचवीशी साधर्म्य असलेली चव जिभेला जाणवली की ... असाधारण आनंद होतोइथे तर चवीत फरक नव्हताचफरक पडला होता - तोअसागाडीवर धंदा करून रसवाल्याने 'समोरची बिल्डिंगविकत घेऊन टाकली आणि तो आता 'दुकानातआला होताआपण रसालाजूस म्हणू लागलादुकानात आधुनिकीकरण केलं - सगळं ऑटोमॅटिकव्हीडिओ बघा मग समजेलत्याची 'उत्पादकतावाढली होतीयंत्रातून आता एका मिनिटात दहा ग्लास भरत होतेपूर्वी त्याचा 'गल्लाभरत असे आणि 'सुट्ट्या पैशांवरचर्चा होत असेआता त्याचंबँक अकाउंट 'फोन पेद्वारा भरत आहे. 'रसाची चवसोडून सगळं बदललं होतंआणि हेच त्याच्या 'स्टार्टअप यश होतंमाझ्या वाईटखोडी नुसार मी या चाळीस वर्षांपूर्वीच्या स्टार्टअपचा आजचा ताळेबंद मांडलाहा गाडीवाला आज कमीतकमी वर्षाला एक कोटीचा धंदाकरत असेल आणि पन्नास लाख रुपये कमवत असेलसातत्याने एकच चव दिली कि लोकांना आवडतंमाझं जूस बरोबर मस्त रंजनचालू होतंतेवढ्यात 'रिकामे ग्लासउचलण्यासाठी पोरगा आलामाझा ग्लास पहिल्या घोटानंतर तसाच होतापोरगा म्हणाला 'साहेबते आइस्क्रिम विरघळंल नाप्या लवकर'. माझी तंद्री 'भंगली'. मी 'रसास्वादनव्हे तर 'जुसास्वादघेऊ लागलो दुकानातील गर्दी बघत'गलाससंपवलापरत गरम होऊ लागलं. *मनाने विचारलं 'दुसरा ग्लास?'. तर त्याच मनाने उत्तर दिलं 'नको आतापंचाहत्तर पैशांचाग्लासआता चाळीस रुपयेबस झालंत्यापेक्षा 'लिंबपरवडली'. माझ्या विचारांचं मलाच हसू आलंमाझे विचार 'मुर्खासारखेवाटलेकसं बघाखिशात पैसे आहेवेळ आहे तरीही ... ऍडिशनल आनंद नको.*


हे सर्व क्षणार्धात घडलेआणि शरीराने ऑर्डर सोडली - त्या पोराला - 'आणखी एक घेऊन येआईस्क्रिम  वितळलेलं'. आता मात्र'एकाग्रतेनेवर्तमानात राहून जिभेचे चोचले पुरवतो. ...


0/Post a Comment/Comments