*अजून एक 'कासव' संग्रथन*!*
*पूर्वार्ध*
नुकतंच मी माझ्या कौलारू घराचा 'जीर्णोद्धार' केला. घराची नवीन रचना करतांना मी एक कल्पना उराशी धरून होतो. मला माझं'रागरंग' नावाचं घर तत्सम अनुभव देणारं करायचं होतं. थोडक्यात मला क्युरेटर - संग्रहक व्हायचं होतं आणि घरात आर्ट गॅलरीथाटायची होती. माझ्याकडे जुन्या वस्तू आहेतच पण त्यात मी जगप्रवास करतांना ज्या काही 'आठवणी' आणल्या आहेत त्याची भरपडली आहे. त्यात काही चित्र आहेत, काही वाद्य आहेत, वैगरे वैगरे. माझी ध्येयपूर्ती झाली असं वाटतं. माझं घर 'प्रत्येक येणाऱ्याला' वेगळं वाटतं. बहुतेकजण माझी किंचित प्रशंसा करतात. मीही 'प्रशंसा ' न लाजता स्वीकारतो. पण मला मात्र नेहमी 'अपूर्णता' जाणवतराहते - माझ्या घरात 'शिल्पकलेविषयी' काहीही नाही. याची खंत आहे. पण मला खात्री आहे की ही 'उणीव' नक्की ... कधीतरी भरूननिघेल. मी जुन्या दगडी कारंज्याच्या शोधात आहे.
*उत्तरार्ध*
साकेत-दिपालीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 'देव देव' करायचं ठरलं, मागच्या आठवड्यात. कुलदेवता रेणुका मातेचं कुटुंबानेयथासांग दर्शन घेतले. मी ही घेतले. पण मी शिल्पकलेकडे जास्त लक्ष दिले. अचानक 'कुटुंब प्रमुख' साकेत मानकरांनी फतवा काढला- चलो वडनेर. भैरवनाथ हे आमचं कुलदैवत. मी 'हुकूम की तालीम' केली. वडनेर छोटंसं गाव होतं तेंव्हापासून बघत आहे. भैरवनाथाचेमंदिर अन् रथयात्रेच्या परंपरेमुळे प्राचीन वडनेर भैरवमय झाल्याचे अनुभवायला मिळते. पूर्वी वडनेर अन् भैरव ही दोन वेगळी गावं होती. वडनेर म्हणजे वड नेहार म्हणजेच वडांच्या झाडांचा समूह अथवा थापी अन् नेहर म्हणजे नदी. नदीच्या लगत असलेल्या वडांच्या झाडांचासमूह ते वडनेर. तसेच वटक ऋषी नावांच्या ऋषींनी हे नगर वसवल्याचा पुराणामध्ये उल्लेख मिळतो.
मंदिराच्या समोर पोहचलो. गाभारा पुरातन आहे. वास्तू दगडातील आहे - प्राचीन आहे. पण सभामंडप मात्र नवा आहे. अहिल्याबाईहोळकरांनी भैरव गावातील भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावात तीन मजली चावडी बांधली, भैरवनाथ मंदिराजवळ बारव बांधली. अहिल्याबाईंनी बांधलेल्या गावात एकूण चार बारवा आहेत. काळ साधारण १७५०-६० चा असावा.
मी सभामंडपात बसलो आणि लाकडातील कोरीव काम न्याहाळू लागलो. मंडप संवर्धन करतांना चुकीचे दिलेले रंगांचे थर पाहिल्यावरतळ पायाची आग मस्तकात गेली. पण लगेच हा दोन मजली मंडप अडीचशे वर्षानंतर उभा आहे या विचाराने मन शांत झालं. उल्का, आईआणि दीपाली पूजेत / नैवेद्यात मग्न होत्या तर मुलं नारळ फोडण्यात. कुटुंब प्रमुख साकेत - आपण सर्वांना देवापर्यंत आणलं, आताजेचंतेनि पाहून घ्यावं - अशा विचारात नाथाजवळ उभा होता. संगमरवरी फारशी गारवा देत असतानांच मी या वास्तूतील गतकाळाचीकल्पना करत होतो. अहिल्याबाई पूजा करत असतील .... तेंव्हा ... चं ... वैभव ...
तेव्हढ्यात दिपालीने हाकारा केला 'बाबा चला'. मी उठलो, दारात येईपर्यंत मनात प्रश्न आला - मी देवाला नमस्कार केला का? 'चूकभूलदेणे घेणे' या तत्वानुसार मी उंबठ्यावर असतांना डोळे भरून 'काळ्याकुळकुळीत तेजस्वी भैरोबा ' कडे पाहिलं आणि पाऊल बाहेरटाकणार तेव्हढ्यात ...
तेव्हढ्यात माझं लक्ष वर जाणाऱ्या जिन्यात पडलेल्या दगडी अवशेषांवर पडलं. नीट बघितलं. मुंडकं नसलेलं संगमरवरी कासव तेथे पडलंहोतं - धूळ खात. स्वार्थी मेंदू कार्यरत झाला. मी परत मंदिरात आलो अन गाभाऱ्यातील पुजार्याला कासवाबाबत विचारलं. 'काय सांगूसाहेब' अशी सुरवात करून पुजारी म्हणाला 'मागच्या आठवड्यात बहिरोबाच्या रथाचं चाक त्याच्यावरून गेलं त्यामुळे मुंडकं धडावेगळंझालं. मग गावकर्यांनी ठरवलं की नवीन 'कासव' मंदिरासमोर बसवायचं. आणि ते कालच बसवलं. आता हे जुनं कासव 'गंगार्पण' करायचं आहे'. मलाही शिल्प हवंच होतं. माझ्या स्वार्थी मेंदूनं विचारलं 'मला द्याल का?, मी माझ्या घरासमोर ठेवतो जेणेकरून कासवाचंमाझ्यावर 'लक्ष' राहील'. तो तत्पर 'हो' म्हणाला. मी आनंदी झालो. तो गाभाऱ्यात गेला आणि जपून ठेवलेलं 'मुंडकं' त्याने मला दिले. म्हणाला 'नीट चिटकवा'. मी आणखी आंनदी झालो कारण 'संपूर्ण' कासव मला मिळालं. मी ते गाडीत जपून ठेवलं आणि नाशिककडेप्रवास सुरु केला. हवेतंच होतो मी.
माझ्या घरासमोर आमच्या कुलदेवतेच्या मंदिरासमोर असलेलं कासव स्थानापन्न झालं. एक शिल्प. एक योगायोग. श्रीविष्णूंना कुंडलिनीजागृत होण्यासाठी कासवाने प्रार्थना केल्यावर विष्णूंनी त्याला आपल्या मंदिरात प्रवेशद्वारात स्थान दिले आहे. म्हणजेच कासवालामिळालेले हे ईश्वरी वरदान आहे. जे त्याच्याकडे असलेल्या सत्वगुणामुळे मिळाले आहे. कुंडलिनी जागृत होणे ही योगामधील सर्वातउच्च पातळीची साधना आहे. पूर्वजांनी जाणिवपूर्वक ठेवलेलं हे एक प्रतिक आहे.
*आज मी खूप आनंदी आहे. एक शिल्प मिळालं म्हणून - तेही अचानक. देवा, तुझं माझ्यावर लक्ष आहे तर! या पुढे जो येणार तोविचारणार - कासव तुमच्याकडे? मग मी 'पूर्वार्धापासून उत्तरार्धापर्यंत' सगळं 'संग्रथन' करणार.*
*संग्रथन म्हणजे शब्दांच्या साहाय्याने एखादी गोष्ट समग्रपणे सांगणे. बहुदा हा शब्द विनोबांनी खूप वापरला आहे -
Post a Comment