एक गाव , एक स्मशान


एक गावएक स्मशान !


खूप दिवसापासून मनात रुखरुख साचत होतीखोल जंगलात गाडी चालवायची उबळ वर येत होतीआणि काल योग आलाकिंवा मीतो आणलाकिंवा त्यानुसार मी निर्णय घेत गेलोवज्रेश्वरी देवीचं दर्शन आणि अकलोलीची गरम पाण्याची कुंड बघितल्यावर परतीचामार्ग ठरवायचा होतापहिला विकल्प - आल्यामार्गी - भिवंडीवरून नासिकला येणंदुसरा पर्याय - झिडके ते वाशिंद हा रस्ता निवडणेआणि घनदाट जंगलातून प्रवास करणेचोवीस किलोमीटरसाठी एक तास लागणार होतातरीही 'जंगल खुणावतहोतंउल्का आणि मीएव्हढेच गाडीत - गाडी पंक्चर झाली तरअसा प्रश्न सुद्धा माझ्या मनात आला नाहीसूर्यास्त जवळ येत होताबहुदा आजचा सूर्यास्तहा जंगलात होणार म्हणून मी अजूनच उत्साहित - एक्सआयटेड - झालो होतोउन्हाळ्याच्या दिवसातील पिवळं जंगलखरंतर दुःखचजास्त पोहचवतेतरीही ... मी ठरवलं ... आज पिवळ्याच्या ऐवजी 'सोनेरीजंगल पाहू अन अंतास जातांना लपंडाव खेळणारा तो तांबूसगोळा पाहूसूर्य आणि तुम्हीं - दोघंही - चालत असाल तर - बांबूचंसुपारीच्या बागेचं विलोभनीय दृश्य अनुभवूपक्षी ऐकूमाणसं पाहूसोनेरी हा शब्द वापरल्याने एक उभारी आली - मन ताजं झालंगुगल सेट केलं - तरीही नाक्यावरच्या टॅक्सी चालकाला विचारलं 'रस्ताकसा आहे?'. त्यावर तो म्हणाला 'रस्ता बरा आहेशिंगल हायेलई खड्डे हाये'.  त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी जराही विचलित झालो नाहीएक बरं आहे - उल्काला अशा निर्णयाविषयी काहीही घेणं देणं नसतंहा दिलासा फार मोठा आहे


गाडी वाशिंद कडे धावू लागलीसिंगल रोडवाहतूक तुरळकखड्डे भरपूरदहा मिनिटात 'निर्बीडअरण्य सुरु झालाबऱ्याच ठिकाणीकोरडी झाडं जळून खाक झाली होतीजमिनीचा काळा रंग मन भेदत होतामग गाव यायचंयाला पाडा म्हणतातपंधरा वीस घरांची हिगावंडोक्यावर पाण्याच्या हंड्या घेऊन जाणाऱ्या बायका दिसायच्यादोन पाड्यांमध्ये 'सोनेरीजंगल - मधेच दिसायचंकधी कधीअचानक 'हिरवाईदिसायचीजवळ जवळ या जंगलात नऊ दहा पाडे बघितलेगावं म्हणू आपणप्रत्येक गाव सोडलं की एक स्मशानदिसायचंप्रत्येक स्मशान 'सुस्थितीतहोतंगाडी स्लो असल्याने - माणसाच्या या अंतिम 'पडावावर' - मी आत्मीयतेने बघत होतोमनातला फोटोग्राफर जागा होताच - मन म्हणत होतं - मानकर आज फक्त 'स्मशानाचीफोटोग्राफी करमाणसं जशी वेगळी वेगळीअसतात ना तशीच स्मशानेही होतीरंग दिलेली किंवा  दिलेलीडागडुजीला आलेलीपाण्याचा ओहोळ बाजूला असणारी अन कधीनसणारीकाही उंचीवर होती तर एक स्मशान दरीत होतं. 'उंचीवरच्या स्मशानातून सूर्यास्त काय मस्त दिसत असेलअसा विचार मनातयेऊन गेला. 'थांबू का?' असा प्रश्न मी स्वतःस विचारलापण गाडी चढावर होती अन 'मोसमघालवायचा नव्हताआत्ता उल्का कायविचार करत असेलती सुद्धा 'ही स्मशानंबघतंच होतीकधी कधी आपलं माणूस काय विचार करत असेल हे सुद्धा आपण विचारतनाहीएके ठिकाणी पेटलेली चिता शांत झालेली दिसत होतीकवटी फुटली असेलनातेवाईक अन आजूबाजूचे निवांतपणे घोटभर चहापीत असतील -त्याच्या घरीत्याची जगण्याची धडपड शांत झाली आहे - थोडाच काय तो धूर बाकी राहिला आहेउद्या अस्थी विसर्जन ! अरे नदी कुठे आहे तिथे? ....


सोनेरी जंगल बघतांना मी किती वेगळे विचार करत होतोविचित्र वाटलंहो पणनाही पणआजच्या दिवसांकरिता नाही का 'सूर्यमरणार'. आपलंही तसंच आहेमग मृत्यचे विचार अभद्र कसेअचानक काळ्या जळलेल्या जमिनीच्या पार्श्वभूमीवर सोनेरी किरणेमाझ्या चेहऱ्यावर पडलेमी शेवटच्या गावात प्रवेश करत होतोआणिआणि कायस्मशानरंगवलेलंबाजूला नदी - पाणी असलेलीबायका धुणं धूत होत्याउघडी मुलं पाण्यात पुलावरून उड्या मारीत होतीथांबलो मीडोळ्यात  मावणारं स्मशानाचं प्रतिबिंब - पाण्यातलंअन तो पिवळा रंग - मी टिपला कॅमेरातहेच बघायला मी हा जंगलाचा रस्ता निवडला होतासगळं काही शुद्धमारू का मीउडी - पाण्यात


गाडीच्या आरश्यात चोवीस किलोमीटर दिसत होतेड्राईव्ह मजेत झाला (का?). नासिक हायवे नेहमीसारखा वाहत होता



 

0/Post a Comment/Comments