रुग्णानंद
साधारण बारा वाजता पुडेंची पोस्ट बघितली. सांगत होते - काल गुढघ्याचं ऑपरेशन झालं. .... कसं? काय? का? कुठे? याचा उहापोहझाल्यावर पोस्टचा शेवट असा आहे 'मला भेटायला येण्याची तसदी घेतली नाहीतरी चालेल. मीच बरा झालो की येतो तुम्हांला भेटायला'. मला हा शेवट विचित्र वाटला मी मनातल्या मनात म्हणालो 'च्यायला, मी पुंडेना भेटायला जायचं की नाही हे पुंडे नाही ठरवणार. मीठरवणार'. पुंडे यांची तब्बेत बरी नाही (कारण काहीही असो) असं कळल्यावर माझ्या मनात उत्कटपणे जे तरंग उठतील त्यावर मी निर्णयघेईन - जायचं की नाही - भेटायला.
कोणीही आजारी पडलं की मला तीन प्रकारचे लोक दिसतात. उल्काच्या या आजारपणात हे तीन प्रकारचे लोक मी पुनश्च अनुभवले. पहिल्या प्रकारचे लोक येऊन, भेटून, जातात. रुग्णाला भेटून त्यांना आनंद मिळणार असतो. या भेटीत फक्त आस्था असते. उपचार नसतो. निव्वळ आनंदी लोकंच दुसऱ्याला आनंद देऊ शकतात. रुग्णाविषयीच्या उत्कट भावनेतून ही कृती घडते. हे एक प्रकारचं रुग्णाचं 'संचित' असतं. दुसऱ्या प्रकारात 'जाऊ की नको' या संभ्रमात असलेले लोक असतात. आज जाऊ उद्या जाऊ किंवा फोन करू या मुळे 'वेळकाढूपणा' होतो. वेळ गेली की रुग्णाविषयीच्या भावना बोथट होतात आणि मग 'रुग्णभेट' होतंच नाही. विस्मरण सुद्धा होतं. ह्या लोकांनाआपण 'कोणत्या अवस्थेत' जगतो हेच माहित नसतं (बहुदा) त्यामुळे कायम दोलायम स्थिती. आपण 'आनंदी ' आहोत का? असंविचारावं त्यांनी, एकदातरी. हे लोक कायम 'व्यस्त' असतात. बहुसंख्य लोक या वर्गवारीत 'मोडतात'. तिसऱ्या प्रकारचे लोक 'आपणगेल्यामुळे रुग्णास त्रास होईल म्हणून भेट टाळतात'. बहुदा हे लोक स्वतः दुःखी असतात (का?). दुःखी माणूस दुसऱ्याला आनंद देऊशकत नाही. रुग्ण भेटीत दुसऱ्याला 'आनंद' देता आला पाहिजे, हे महत्वाचं.
बरोबर चार वाजता मी 'स्पेशल रूमचा' दरवाजा ठोठावला. जाण्याच्या आधी 'अपारंपारिक' पदार्थ घेऊन गेलो - म्हणजे लस्सी, जूस अनताक यांची एक एक बाटली. शिवाय उल्काने विविध प्रकारच्या लाह्या दिल्या होत्या. हे सांगायचे कारण म्हणजे 'रुग्णाला काय आवडेलयाचा सखोल विचार झाला पाहिजे'* असं मला वाटतं. मला पाहिल्याबरोबर पुंडेच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं अन खात्री झाली मी 'तत्परआलेलं' पुंड्याना आवडलं. ८० वर्षांचे 'गोष्टी वेल्हाळ' पुंडे मला काल घडलेली 'एका गुढघ्याची गोष्ट' तपशीलवार सांगू लागले. मधेचबायको उवाचली 'आहो, जरा थांबा आता'. त्यावर ते बायकोवर उचकले - 'थांब ग, कळतंय मला'. हे संभाषण ऐकल्यावर मी समजलो - पुंड्याना, गप्पिष्ट माणसाला आज खूप गप्पा मारायच्या आहेत. मग पुढील तीन तास कसे हे कळलंच नाही. पुंडे नेव्हीत असल्याने रशिया, युक्रेन, नाटो, ई यू, अमेरिका यांच्यावर ते 'अधिकारवाणीने' बोलत होते. मधेच मी काही 'पिल्लू' सोडत असे. थोडक्यात आनंदाला उधाणआलं होतं आणि 'गुढघ्याची डोके दुःखी' पुंडे विसरले होते. मी 'दोन तीन दिवसांनी परत येतो' असं आश्वासन देऊन उठलो. पुंडेना, रुग्णाला आनंद देऊन उठलो. मलाही आनंद झालाच होता.
प्रत्येक माणसाला तो रुग्ण होतो तेंव्हा इतरांनी येऊन 'मला' भेटावं असं वाटतं. कदाचित तो रुग्ण 'रुग्ण नसतांना' स्व-आनंदात असल्यानेकोणाला भेटायला सुद्धा गेला नसेल. म्हणून आपला समाज 'कोरडा' होऊ लागलाय. भावनेचा 'ओलसरपणा' तळात पोहचलाय. विहीरआटली हो. ह्या 'होऊ घातलेल्या दगडी समाजास' आपण पाझर फोडू शकतो. अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यानं बनलेल्या समाजाचंआरोग्य या समूहातील प्रत्येकाच्या वैयक्तिक आरोग्यावर अवलंबून असतं. प्रत्येकजण मानसिक आणि शाररिकदृष्ट्या निरोगी असेल तरसमाजाचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून 'भेटा' एकमेकांस - भेटीत तुष्टता मोठी. कुठेतरी आपल्यातल्या 'मी' च विघटन आणि विसर्जनकेलं की ..... असो. स्वतःमधे छोट्या स्वरूपात बदलाची सुरवात करून समष्टीपर्यंत नक्की पोहचता येईल.
Happiness is pure vibration that emanates from the center of our being. It defines quality of our soul. Visit a patient and seek the source itself for ‘time being’ happiness. Nothing is lasting for long, be it happiness.
*पुंडे पोस्टच्या शेवटी म्हणतात 'शिवाय हे लिहीत असतांना सहज आठवले - श्री दत्त आरतीतिल तीसरे कडवे - दत्त दत्त ऐसे लागलेध्यान, मीं तु पणांची झालीबोळवण
किंवा एका भुपाळीतील ओळी ,
माझे माझे लोप पाऊदे , तुझे तुझे उगवु दे ,
मीं कोण असे, तो मीं, तो मीं, सहज पणें कळु दे. *
आज World Happiness Day आहे म्हणे.
*ता. क. - उल्काची मैत्रीण मिना यांनी सामोसे आणले होते. मंगल हिने चकल्या आणि मटार करंजी आणली होती. शोभावहिनी यांनीमेथीची भाजी पाठवली. ... यादी मोठी आहे. यादे चिरंतन आहेत.
Post a Comment