अनपॉज्ड चाळीशी ?!
*बेचाळीस वर्षांपूर्वी मी तिच्याकडे एकटक पाहू शकत नव्हतो. 'डोळे दिपायचे का?' असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तो .... चाळीस वर्षांपासून प्रयत्न करत आहे. पण आज बघतोय 'एकटक' कारण ती झोपली आहे म्हणून!*. सांगतो - विस्तारपूर्वक ..
आयुष्याची चाळीशी संपली की साधारणतः 'चष्मा' लागतो असं म्हणतात. कदाचित 'गधड्या' आतातरी 'नीट' बघ आयुष्याकडे असंसुचवणं असेल त्यात. आयुष्याच्या सिहांवलोकनासाठी मला चार खंड पडावेसे वाटतात, वेळेचे - प्रत्येक खंड वीस वर्षांचा - २०, ४०, ६०आणि ८०. या प्रत्येक वळणावर, जमलं तर बघा, मागे. ८१ नंतर स्मृतीभंश झाला तर .... होतोच तो ...
मी सध्या त्रेषष्ठीत आहे. मागच्याच आठवड्यात लग्नाला चाळीस वर्षे झाली. मोठा काळ गेला - वाहून. (पहिली 'नजरानजर' ४२ वर्षांपूर्वी- १९८०.) यांत्रिकपद्धतीने काहींनी माझं या निमित्ताने 'अभिनंदन' केलं. माझ्या उषा आणि आशा मावशीने 'ब्लॉग नाही लिहिला? असाप्रश्न ही केला - अभिनंदन केल्यावर. यात 'अभिनंदन कशासाठी?' असा अत्यंत महत्वाचा पण किचकट प्रश्न मी मुद्दाम विचारला नाही. बरीच दांपत्ये 'एकमेकांविषयी इंग्रजीत भरभरून लिहितात' फेसबुकात. ते वाचून मला बऱ्याच वेळा दम लागतो. चेष्टा करत नाही - पणफार अवघड शब्द वापरतात हो लोक. मला एक कळत नाही - की लोकं असं 'चॉकलेटी' कसं लिहितात. आमची तर भांडणं सुद्धा प्रचंडमोठी होती. त्यात मी 'पुरुष प्रधान' व्यवस्थेतून ( की अवस्थेतून ) आलेला नवरा ... त्याच्या बरोबर चाळीस वर्षे 'घालवणं' म्हणजे जराअवघड. ‘Arranged Marriage’ असेल तर गोष्ट वेगळी - ही (घे) बायको आणि कर प्रेम हिच्याशी' असा मनोव्यापार. पण आमचं तरLove Marriage - आधी लव्ह अन नंतर ही लव्ह. लव्हच लव्ह. मी आधी लव्ह आणि नंतर तिच्या बरोबर मॅरेज केल्यावर खूप जणांनाधक्का बसला. 'खाली मुंडी अन पातळ धुंडी' ही म्हण मी बहुदा खरी केली असावी. पण झालं काय - मी सहा फूट असल्याने मुलींकडेबघतांना खालीच बघावं लागत होतं, जसं अमिताभला बघायला लागत असेल तसं .. जया कडे. आणि असं केल्याशिवाय जया कशीसापडेल. मग आमचं 'हिंदी सिनेमातील प्रणयातुर' जोडपं पळून जातं काय अन आम्हीं संसार सुरु करतो काय ... सगळीच गंमत जंमत. आमचं तेव्हाचं खरं 'सैराट'. या घटनेला चाळीस वर्षे झाली. 'कोर्ट मॅरेज' ला लग्न म्हणतात का? माहित नाही. पण लगीन म्हणजे एकसुंदर (?) प्रवास, खडतर वाट. भरपूर जबाबदाऱ्या - प्रेमाच्या अट्टाहासातून येणाऱ्या. आमच्या घरी तर - शोकसभा ... लव्ह मॅरेज म्हणजेउन्मत्त होऊन केलेलं प्रेम. दोघांनाही समान संधी - प्रेम करण्याची आणि न करायची. यामुळेच प्रेमात मैत्री जास्त असते. वचन पाळणंमहत्वाचं. मानसिक आधार वैगरे वैगरे आलंच. मुख्य म्हणजे माणुसकी असलीच पाहिजे. पण हे सगळं असणं मला विशेष वाटत नाही. दोन पायांच्या या प्राण्यांकडून एव्हढी तर अपेक्षा करणे हे गैर नसावे.
खरा प्रश्न मनात असा यायला हवा कि - 'ही' किंवा 'हा' माझ्या आयुष्यात आला(च) नसता तर काय झालं असतं? ( तू नही तो और सही- असा दृष्टीकोन चुकीचा - कारण - हीच ती तुझ्यासाठी अन vice varsa ). Alternatively the Question 🙋♂️ should be ‘ Did my spouse enhanced the value of my life ‘and or’ did I enhanced her/his life?
माझ्या पुरतं सांगायचं तर सांगता येईल कि उल्का माझ्या आयुष्यात आली नसती तर मी 'किंचित कानसेन' झालो नसतो. आमच्याखानदानातलं कोणीही इतक्या जवळ गेलेलं नाही. संगीतातलं काहीही कळत नसलं तरी मी मोठ्या गायकांच्या चुका काढू शकतो. म्हणजे जरा कुठे सूर 'घसरला' मी गायकाकडे बघतो. तो पर्यंत गायकाचा हात कानापर्यंत पोहचलेला असतो. पहिल्या धड्यात मी पासहा आनंद मोठा. उल्का 'विशारद' आहे म्हणून तिच्या हट्टासाठी आम्हीं 'सवाई गंधर्व' च्या वाऱ्या करू लागलो अन मला 'ख्याल गायन' आवडू लागलं - अजूनही समजत नाही, पण मी आनंदी आणि तल्लीन होतो. हा स्रोत उल्काने सुरु करून दिला. रशियातील बॅले, यूरोपातील ऑपेरे बघतांना आणि मोझार्ट ऐकतांना या 'ध्यासाचा' उपयोग झाला. संगीताशी ही किंचित 'जवळीक' केवळ उल्कामुळे. अजूनही मला आशा आहे की मी सिंथेसायझर शिकेन म्हणून.
उल्काची आणि माझी चुकामुक झाली असती तर ती 'बॅकपॅकिंग' ला मुकली असती. प्रेमात 'उंडारणं' खूप महत्वाचं. तिने मला याबाबतीत खूप साथ दिली. कोणत्याही प्रवासात कोठेही त्रास दिला नाही. पूर्ण व्हेज असूनही तक्रार नाही. मी कोठे काय खातो अन पितोया विषयी अडवणूक नाही. माझ्या एका भावाची बॅकपॅकिंगची इच्छा केवळ 'तिला नाही आवडत रे' या मुळे राहिली आहे. या तिच्या 'न-तक्रार' गुणामुळे तिने सुंदर जग पाहिले - अजूनही मला तिचे हास्य आठवते - चीनच्या भिंतीवर पाऊल ठेवले तेंव्हा, फ्रान्सच्या आयफेलटॉवर वरून पॅरिस बघतांना, साऊथ आफ्रिकेला जातांना नेल्सन मंडेला भेटले तेंव्हा ....
या अमिताभने तिला लंडन मधील तुसाद म्युझियममध्ये असलेल्या अमिताभशी भेट घडवली. आम्हीं एकमेकांस 'अनुरूप' आहोत काय? हा प्रश्न मला अजूनही पडलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आदर्श जोडीदार आणि अनुरूप जोडीदार हे दोन्ही ट्रॅक्स एकाचवेळी चालू असतात. 'आदर्श नवरा' या पासून मी कोसो दूर आहे. पण नाऊन - Naun - या अर्थाने 'अनुरूप' म्हणजे पॅरलल. असं बघितलंतर 'हो आम्हीं आहोत - अनुरूप' सेल्फ सर्टिफिकेशन. अँड paralal नेव्हर meet - they coexist ; We coexisted, so far, unpaused ;
*इतक्यात बेड वर काही हालचाल झाली. तिची तब्बेत बरी नाही आज. ती जागी होत आहे ... मोठ्या 'विशेष' विश्रांतीनंतर*
मावशे - आशा आणि उषा - ब्लॉग लिहिला गं. वाचा आता.
Post a Comment