* भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥*
मुंबईवरून परत घरी येतांना असंख्य विचारामध्ये एक विचार 'त्यांचा' होता आणि माझी अवस्था तुकारामांनी वर्णन केलेल्या प्रमाणेझाली होती. अर्थात तुकारामांना विठ्ठलाला भेटायचे होते तर मला मांजरीच्या पिल्लाना. आम्हीं घरी नव्हतो तेंव्हा आमच्या घरात दोननव्या सदस्यांचे आगमन झाले असं दिपालीने कळवलं. अनाहता आणि त्वमेव यांचा 'धनु मामा' हा प्राणी वेडा आहे. त्याने भाच्यांनाही भेट दिली. चार पाच महिन्यांपूर्वी आमची दोनही मांजरं अचानक ढगाआड गेली. आमचं 'सोयरं सहचर' फक्त आठ महिन्यांचं. त्यांनी प्रचंड आनंद दिल्यामुळे आता एक पोकळी निर्माण झाली असं वाटायचं.
पण आज धनूने, मामाने, पोकळी भरली आणि दहा दिवसांपूर्वी या जगात आलेली दोन पिल्ले आम्हांला 'दत्तक' दिली. तब्बेत बरीनसतांना 'दत्तक आईने', दिपालीने, माझ्या सुनेनं त्यांना दूध पाजायला सुरवात केली. दत्तक मुलांचं कौतुक मला फोन वरून कळवलं- 'आहो बाबा त्यांना ओंजळीत पकडावं लागतं आणि ड्रॉपरने दूध पाजावं लागतं' - दीपाली उवाच. व्हीडिओ कॉल करून मीअनाहताचा आणि त्वमेवचा आनंद टिपला. तेव्हढ्यात दिपालीने स्लो मोशन मधला व्हिडीओ पाठवला.
म्हणून म्हणतो 'भेटी लागी जिवा' अशी अवस्था. त्यात आर्तता होती. कोमलता होती. लताबाईचें गाणं ऐकले की 'उलगडा' होतो - तुकारामाच्या आर्तेतेचा - state of affliction.
प्रत्येक जीवाची एक ओळख असते. आयडेंटिटी असावी म्हणून आपण त्या जीवाचं 'नाव' ठेवतो. काय नाव ठेवलं असेल, दिपालीने. मागच्या वेळी 'शोध' घेऊन नाव ठेवलं होतं. मला विचारलं तर? उत्तर तयार ठेवावं म्हणून मी विचार पूर्वक दोन नावं सुचवून. 'विचारलंतर' असं म्हणतोय कारण 'त्यांच्या संसारात .....' एकीचं नाव 'Mozarti' असावं आणि दुसरीचं 'बेथू'. ही दोन्ही पिल्ले नर की मादीयाचा विचार न करता 'मांजर म्हणजे स्त्रीलिंगी' असा समज. बोके दिसतात कुठे हल्ली. मांजर घरात असली की अखंड मोझार्ट ( Austrian - a prolific and influential composer of the Classical period lived only for 35 years) आणि बीथोवेन ( Beethoven - German composer of instrumental music (especially symphonic and chamber music); who continued to compose after he lost his hearing (1770-1827)) यांचं संगीत चालू असतं. या निमित्ताने त्यांची आठवण आणि ओळख. यादोघांच्याही संगीतात खूप 'आर्तता' मला जाणवली.
कुत्र्यापेक्षा मला मांजरी आवडतात. घरात असल्या तरी इकडे तिकडे घाण करत नाही. त्यांना एकदा जागा दाखवून दिली की विषयसंपला. इथे माणसं 'घाण करू नका' असं सांगूनही घाण करतात. (माझ्या घरासमोरील सोसायटी मधील एक साठीची महिला घरातलंउरलेलं दररोज माझ्या घरासमोर टाकते - गायी साठी. सांगितलं पण ऐकतो कोण? बरं आमच्या सावरकर नगरात गाय कशाला येईल! मरायला? विषयांतर टाळतो - माणसांबद्दल बोलायचं टाळतो )
मला मांजरीला जवळ घेऊन तिचा श्वास अनुभवायला आवडतं. कुत्र्यांना माणसं हवी असतात अगदी अंगाखांद्यांवर खेळायला. ते आपलंस्वागत 'आक्रमक' पद्धतीने करतात. पण मांजरीला स्वतंत्रपणे 'आपल्या आपल्या विश्वात' राहायला आवडतं. क्वचित मांजर स्वागतवैगरे करते. पण आपण घरी आलो की जवळ कुठेतरी 'नजरेच्या टप्प्यात' बसतात आणि मनातच म्हणतात - 'मला जवळ घेतलं तरीचालेल ... पण न घेतलं तर आवडेल. रात्री झोपतांना मात्र मी अनाहताच्या गादीवर अन तिच्या कुशीतच झोपणार'.
बोलता बोलता, गाडी चालवता चालवता, विचार करता करता, हायवे वरच्या एक्झिट वर पोहचलो. नासिक शुन्य असा बोर्ड. पाळीवप्राणी घरी आले की समष्टी बद्दल एक वेगळं प्रेम जागृत होतं, त्या प्रेमाला मी ..... म्हणून मी म्हणतो 'भेटी लागी जिवा ..... '
समष्टी म्हणजे? - समष्टि—स्त्री. १ व्यष्टींचा समूह; सामग्रय; समुदाय; अनेक घटकांगांनीं संपूर्ण; संगृहीत, समाविष्ट स्थिति. 'ईश्वरोपाधिसमष्टि जीवोपाधि व्यष्टि.' २ ब्रह्मांड. ॰ग्रह-पु. संपूर्णत्वानें, एकत्वानें जाणीव, ज्ञान; समृह रूपानें ज्ञान. याच्या उलट पृथक्त्वानें जाणीवम्हणजे व्यष्टिग्रह.
Post a Comment