गुला-वंदी
थोडंसं उजाडलं असेल तर बाहेर पडण्याआधी मी माझ्या अंगणातील फुल झाडांकडे बघतो, आज कोण कोण फुललंय हे बघण्यास. मनप्रसन्न करून घेतो. मी त्यांचा पालक आणि ते माझे पाल्य असं आमचं नातं आहे, अबोल. मी बोलतो त्यांच्याशी, पण ते नाही बोलत. नुसतं बघतात माझ्याकडे. मी हळुवार स्पर्श करतो ...
खरंतर बाग उल्काची आहे. तिचं खूप प्रेम आहे. ४८ कुंड्या आहे. पण काळ काम अन वेग यांच्या व्यस्त प्रमाणामुळे तिला बागेवर म्हणावंअसं पालकत्व निभावता येत नाही. मग एक दिवस मी घोषित केलं - आजपासून मी त्यांचा पालक. मला बागेत बिलकुल रस नव्हता. पणदेखभाल करत असतांना हळू हळू मी त्यांच्यात गुंतत गेलो. त्यांना लहानाचं मोठं होतांना बघत आहे. कोणत्याही रोपाची पहिली कळीआणि पाहिलं फुल अत्युच्य आनंद देऊन जातं. ऊन रोपांवर पडलं की ती जास्त फुलतात म्हणे, म्हणून मी ते सूर्याच्या संपर्कात जास्तीतजास्त कसे राहतील हे बघितलं. कोणतं रोप पाण्याअभावी कधी मान टाकतं हे समजू लागलं.
ही मुलं डोळ्यांदेखत केव्हा मोठी होतात, हे पालकांना कळतच नाही. तसंच माझंही झालं. आता तो गुलाब आणि ती जास्वदीं वयातआली आहे असं जाणवलं. वयाचे टप्पे ओलांडणार्या या मुलांशी सुसंगत संवाद करावा लागतो, पालक नव्हे तर मित्र म्हणून.
गुलाबाला मी धीरज जेजुरकर या 'गुलाबवाल्या शेतकऱ्याकडून' घरी आणलं. तर जास्वदीं चं आगमन गंगापूर गावातल्या नर्सरीमधून. गुलाबाला कलम केलेलें होते तर जास्वदीं फक्त काडी. पण दोघंही बहरले आमच्या अंगणात.
त्यांचं, गुलाबाचं अन जास्वदींचं लग्न लावलं तर राहतील का ते सुखी असा विचार मनात डोकावला, पाहिलं पायडल मारल्याबरोबर. आहेत का ते दोघं अनुरूप - एकमेकांस?
अनेकदा मनातल्या जोडीदाराविषयीच्या कल्पना आदर्शत्वाकडे झुकलेल्या असतात. कोणतेच नाते आदर्श नसते, कारण माणसे आदर्शनसतात. आणि आदर्श जोडीदार किंवा perfect partner हे एक मिथक आहे. पण फुलांचं काय? ते तरी 'आदर्श' असतात काय ? मग मीवधू आणि वरांच्या स्वभावाविषयी विचार करू लागलो.
गुलाब मला जरा आढ्यतेखोर वाटला - किंचित शिष्ट. खरंतर त्याला हा एक्सट्रा शहाणपणा शोभतो. गुलाबाची दखल लग्नकार्यातघेतली जाते. गुलाब मिळाला की पुरुष मंडळी त्याला वरच्या खिशात ठेवत मिरवतात तर स्रिया केसात माळतात. गुलाब विविध रंगीअसले तरी विविध ढंगी नसतात.
जास्वदीं मात्र सुंदर, नाजूक आणि गरीब बिचारी आहे. हिची जागा मात्र थेट देवघरात. गणपतीची पूजा तर 'हिच्याशिवाय' होणे शक्यनाही. जास्वदीं अनेक रंगी आणि अनेक ढंगी असते. बाराही मास बहर. सुंदर तुरा असूनही जास्वदीं कधीच तोरा मिरवत नाही.
या दोघांच्या 'अनुरूपतेविषयी' खूप विचार करत घरी आलो. अनुरूपता ही फक्त 'कल्पनाच ' आहे का? आदर्शत्व आपल्याकडेनिसर्गाबरोबर आलेले असतं, पण अनुरूपता ही आपल्याला जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते.
घरी आल्यावर मी उल्काला विचारलं 'लावायचं का यांचं लग्न? तुळशीच्या लग्नाप्रमाणे?' तर ती हसायला लागली. नंतर मात्र गंभीरझाली. म्हणाली 'लावू लग्न. जमेल त्यांचं. एकाच अंगणात फुलली आहे. आपले संस्कार तसे सारखेच अन चांगले झालेत. करू काहीतरीवेगळं. पत्रिका मात्र छापायच्या बरं का!'
मी आणि उल्का एकमेकांस 'अनुरूप' आहोत असं क्षणभर वाटून गेलं. एकत्र आनंदाने जगायचं असेल तर उभयतांच्या 'आवडी' सारख्याअसल्याच पाहिजे. असो.
पत्रिकेचा 'मसुदा' मला कोणी सांगाल का? पत्रिकेत खालील फोटो छापावे लागतील. लग्नाला नक्की यायचं. फुलं सोडून 'काहीही' आहेरस्वीकारायला आम्हांला आनंद वाटेल.
एक ललित की एक लळीत ?!
Post a Comment