एक दुर्मिळ ....


 एक दुर्मिळ ...


शेखर-संजीवनी सुरेश-स्मिता यांना भेटतातमैत्री तशी नवीदोनतीन महिन्यापूर्वीचीएकदा शेखर अँड कोसुरेश अँड को. ( को म्हणजे - Co - Company) यांना भेटतातशेखर सहज विचारतो - मानकर अँड कोला भेटायला आवडेल कासुरेश 'होका नाही?' म्हणालाशेखरने मला विचारले 'येउ का?'. मी म्हणालो - यावा की होका नाही


बरोबर पंधरा मिनिटांनी गँग्स ऑफ मित्र घरी पोहचलेगप्पांचा पाऊस पडला - पुढच्या तास दोन तासमजा येत होती कारण गप्पांमध्येविविधता होतीएक जण व्यापारीएक मिलिटरीमधला कमांडिंग ऑफिसर आणि एक 'भटका'. मस्त कॉकटेल झाली होतीजेंव्हासंगीतावर गाडी घसरली तेंव्हा सुरेश मला विचारता झाला - मानकरा तुला 'अमुक तमुक गायक माहित आहे काअरे फार सुंदर गातो...'. त्याने अमुक तमुक ची खूप स्तुती केलीमला ते गायक माहित नव्हतेपण उल्काला माहित नव्हते याचं आश्चर्य वाटलं - नासिकचाप्रतिथयश गायक उल्काला माहित नाही?! - हे झालं कसं बुवा - या विचारात असतांना - सुरेश म्हणाला - आपण 'अमुक तमुक चीमैफिल ठरवू का?' मी म्हटलं - मस्त आयडिया आहेकाही मदत लागली तर सांगाकिंवा माझ्या घरीच मैफिल करूचाळीस पर्यंत श्रोतेबसू शकतील. … 


हा विषय माझ्या करिता तेंव्हाच संपला होतापंधरा दिवस गेले.


*श्री गुरुदेव दत्त जन्म दिवस - मार्गशीर्ष शके १९४३*


मी आणि उल्का सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुरेशच्या घरी पोहचलोपाच मिनिटे उशीरबघतो तर काय - गायक तंबोरेलावून जणू श्रोत्यांची वाट पाहत होतेचेहरा अतिशय प्रसन्नगुरुमाऊलीच्या चेहऱ्यावर जे हास्य विलसत असतं तेच गायकाच्याचेहऱ्यावर. 'अमुक तमुकचाबाह्य रंग मला भावलागायक महाशय प्रो-प्रोफेशनल दिसत नव्हतेअध्यात्मिक वाटत होतेसुरेशने होऊघातलेल्या खाजगी मैफिलीचे प्रयोजन आणि कारणमीमांसा केलीसुरेश सांगत होता - *पद्मविभूषण संगीतमार्तंड पंडित जसराजजीयांचे शिष्य पंडित प्रसादजी दुसाने (नासिकयांच्या शास्त्रीय  भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आपले स्वागतचला तर 'एक अध्यात्मिकसांगितिक प्रवासकरू*


पुढचा प्रवास कसा झालाकाय सांगूअवघ्या १० जाणकार श्रोत्यांसमोर सादर होणारी कला 'दिवान--खासझालीधर्मसंगीताचाआनंद गायक आणि श्रोते 'एकहोऊन घेत होतेअभंग 'सुरावटीनेसजवले जात होतेअभंगवाणी - अहाहाहामराठी आणि संस्कृतउच्चार - अतिशय उत्तम आणि स्पष्टआम्हांला गाणं नीट समजावं म्हणून 'चीजापंडितजी नीट समजावून सांगत होतेगायनात एक'सहजताहोतीकुठेही 'अट्टाहासनव्हतामी तर त्यांच्या अगदी समोर बसलो होतो ... त्यामुळे आणखी 'जवळीकसाधली गेलीजेंव्हापंडितजींनी विचारलं ' कोणाला काही ऐकायचं आहे ?'. मी लगेच म्हणालो - 'देवा ते जसराजांचं 'ओम नमो भगवतेऐकवा ना'. त्यावरत्यांनी आपले दोन हात दोन कानावर नेले अन म्हणाले - ऐकवतोगुरुविषयी लीनतेची भावना ओतप्रोत भरलेली होतीवातावरणात'अध्यात्मगच्च भरलेलं होतंशेवटी दत्ताची आरती झालीदुधाचा प्रसाद आणि राजगिरा वड्या यासह मैफिलीची सांगता झालीगप्पांमध्ये पंडितजी सांगत होते - गेले पाच सात वर्षांपासून ते गोवर्धन (नासिकयेथे हेमाडपंथी दत्त मंदिरात सकाळी चार ते सात 'गायनसेवादेत आहे


अशा मैफिली हल्ली 'दुर्मिळझाल्या आहे


आम्हीं जेंव्हा घराकडे निघालो तेंव्हा मंत्रमुग्धसुरमुग्ध झालेलो होतोउल्काला मी विचारले - एव्हढा मोठा गायक 'नासिकलाकसामाहित नाहीएव्हढा कसा हा प्रसिद्धीपरान्मुखउल्का म्हणाली - मी विचारलं सुरेशला या बद्दलसुरेश म्हणाला - *जेंव्हा पंडितजसराज्यांच्या शिष्यत्वासाठी श्री दुसाने गेले होते तेंव्हा पंडित जसराज यांनी विचारलं की ' तुला गायक व्हायचं की साधक ?'. श्री दुसानेयांनी उत्तर दिले - साधक.*


म्हणून पंडित दुसाने जगाला माहित नाहीपण गुरुदेव दत्तांना माहित आहेपंडित दुसाने - एक दुर्मिळ व्यक्तिमत्व - अफाट साधकगाण्याची एक झलक पाठवत आहे


गुरुदेव दत्त. 'तेरी महिमा

0/Post a Comment/Comments