आज वसूबारस. पिवळा झब्बा आणि पांढरा शुभ्र लेंगा घालून, शुचिर्भूत (निर्दोष, निर्मळ,निष्कलंक, पवित्र, शुद्ध, स्वच्छ) होऊन, सौदीअरेबियन 'उद' चा फवारा मारून मी नवरचना शाळेत पोहचलो. उल्का आहे बरोबर. गल्लीतच कार्यक्रम आहे मग गर्दी केलीच पाहिजे. अंधाऱ्या कुंद वातावरणात 'आ' लावला जात होता आणि पदन्यासाची तयारी पूर्ण झाली होती. बहुदा दोन वर्षानंतर रेखाताई आणिविद्याताई 'नाचाचा - नृत्याचा' कार्यक्रम सालाबादप्रमाणे दिवाळीच्या सकाळी साजरा करत होत्या, आपापल्या विदयार्थींनींना घेऊन. नाशिकवर निसर्ग थंडीचा एक एक पदर टाकत थंडी वाढवत आहे. मन हळू हळू प्रसन्न होऊ लागलं. नृत्य हा अवकाशातला आकृतिबंधआहे आणि वास्तू, चित्र व शिल्प या कलांप्रमाणे अवकाशबद्ध लय त्यात साधली जाते. श्राव्य व दृश्य अशा दोन्ही अंगांची लय साधणारीनृत्य या कलेचा उत्तुंग अविष्कार झाल्यावर भैरवी सुरु झाली आणि कळलं की दीडतास झाला. आज मला विशेष करून हस्तमुद्रा जास्तभावल्या. नृत्य करीत असताना हाताच्या बोटांचा जो विशिष्ट आकार साधण्यात येतो, त्याला नृत्यमुद्रा अथवा हस्तमुद्रा असे म्हणतात. नृत्यात भावाभिव्यक्तीसाठी नर्तक किंवा नर्तकीला हस्तमुद्रेचाच आधार घ्यावा लागतो. इतकेच नव्हे तर, हस्तमुद्रेच्या विनियोगानेनृत्यातील विविध ‘करणां’ना (पोझेस) अधिक सौंदर्य प्राप्त होते. कलाकार काय जबरदस्त चैतन्य ओततात या हातात अन बोटात. दगडातील शिल्पांकडे नीट पहा, शिल्पकाराने लांबसडक बोटांकडे विशेष लक्ष दिलेलं असतं, इतकं की, कमनीय बोटं मुलायम सुद्धा आहेहे मनास जाणवतं. येथे जोडलेली चित्रफीत पहा.
कार्यक्रम संपल्यावर मी उल्काला म्हणालो - मी जरा कलाकाराला भेटून येतो. का कुणास ठाऊक, मी जेंव्हा अतीव आनंदात असतो तेंव्हामला 'दुःखी' माणसं आठवतात. या कलाकाराला असाध्य रोगानं गाठलं आहे, तीन वर्षांपासून. हा कलाकार चित्रकार आहे. माझ्यावर'विशेष' लोभ आहे. म्हणून गेलो त्याच्याकडे सात वाजता, थोडा आनंद द्यायला. हा कलाकार स्वामी समर्थ भक्त आहे. समर्थांच्याकेंद्रांमध्ये जी आठ बाय आठ साईझची समर्थांची चित्र आहेत ती या कलाकाराने 'चितारली' आहे - ऑइल पेंटिंग्स आहेत ती. दर्शनघेणाऱ्यास 'स्वामी' आपल्या समोर बसले आहेत असं वाटतं - इतका 'जिवंतपणा' साधतो हा चित्रकार. वयाच्या ७० राव्या वर्षी सुद्धा हा'रियाझ' करतो. अव्याहत पेन्सिल स्केचिंग चाललेलं असतं.
आज मात्र कलाकार निस्तेज होऊन पडला होता. पण मला पाहिल्याबरोबर त्याला 'उभारी' आली. डोळे लकाकले. मी त्याचा कृश हातहातात घेतला. त्याची ब्रश पकडणारी बोटं कुरवाळली. थोडी दाबली. यामुळे तो मंद हसला असा मला भास झाला. काहीतरी पुटपुटला. बहुदा हॅप्पी दिवाळी म्हणाला. मी कलाकाराच्या अगदी जवळ बसलो - असहाय्य शांततेत. मन तर रडत होतं पण मी जाणीवपूर्वक डोळेकोरडे ठेवले. त्याच्या डोळ्यात बघत होतो. विश्वाचे नियमन एका लयीने होत असते. मानवी हृदय परिपूर्ण लयीने स्पंदन पावले पाहिजे. त्या स्पंदनातील अनियमितता म्हणजे रुग्णावस्था. कलाकार या अवस्थेत आहे. मन, विचार शाबूत आहे पण हात अन बोटं काम देईनाशीझालीत. काय भयंकर 'क्रूरता' आहे ही!
माझं मन मागे धावू लागलं. आई वडील आणि गुरुजन या नंतर या 'कलाकाराने' माझ्यावर संस्कार केले आहे. आम्हीं सख्खे आणि चुलतमिळून सात भाऊ. कलाकार हा आमचा सर्वात मोठा भाऊ. मी लहान असतांना कलाकाराने मला खूप सिनेमे दाखवले - सिनेसंस्कार केले. पाचवीत असतांना माझी 'हस्त व्यवसाय' ची वही कलाकार करून देत असे. फुलांची नक्षी कशी काढावी हे त्याने मला शिकवले. माझ्याहाताला 'कॅलिग्राफी'साठी ज्या हातांनी 'वळण' लावले तेच हात आज 'क्षीण' झाले होते. फोटो कंपोझ कसा करावा याची प्रात्यक्षिकेआठवली. माझं लग्न झाल्यावर 'उल्काची फोटो सेशन्स' आठवली. .......
बहुदा वेदना असहाय्य झाल्या असतील म्हणून कलाकाराने हात उचलला ... बोटं .... पण आज त्या हातात चैतन्य नव्हते. ब्रश नव्हता.
कलाकाराच्या हातात चैतन्य असेल तर काय होऊ शकतं हे मी नृत्यात पाहिलं. चैतन्य नसेल तर वेदना किती भयानक असतात हे बघतआहे.
Post a Comment