वेदनेचा 'हुंकार'
नाटकाची 'कार्यशाळा' संपल्यावर (नटसम्राट) विक्रम गोखले विश्रांती घेत होते, तरीही होऊ घातलेल्या 'नाट्यकर्मींशी' गप्पा मारत होते. मी अगदी सहज विचारलं ' नट नसता झाला तर काय झाला असता ?'. त्यावर सर तितक्याच सहजतेने म्हणाले ' मी नक्की मिलिटरीसर्विस केली असती आणि चांगल्या रँक मध्ये रिटायर झालो असतो. I respect Indian Defense Services very much’. खरं तरविषय संपला होता. पण? आमच्या बरोबरची एक सहयोगी रिटायर्ड कर्नलची बायको होती. ती म्हणाली 'सर खरंतर मिलिटरीऑफिसरच्या बायकोस, मुलांस आणि आई वडील यांना जास्त सन्मान मिळायला हवा, कारण त्यांचं दुखं आणि वेदना या खूप जास्तअसतात. आणि याची कोणीही दखल घेत नाही’. या वेदनामय टिपण्णी नंतर एक वेगळी, असहाय्य शांतता निर्माण झाली. काहीवेळानंतर शांततेला विक्रम सरांनी वाचा दिली ... आणि नट ... नाही एक सामान्य माणूस बोलू लागला .....
काल साकेत आणि तीन मित्र मोठ्या धाडसी प्रवासानंतर घरी परतले. मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. ज्यांनी चवदादिवसांपूर्वी 'काय गरज होती असे रिकामे उद्योग करायची?' असा सूर लावला होता तेही या मुलांना 'congratulations 🎈 all the best for future endeavors’ असा सूर आळवत होते. जर काही 'वाईट झालं असतं' तर हे लोक म्हणणार 'मी म्हणत होतो कि असे उद्योगकरू नये'.
अगदी मनातलं आणि तळातलं सांगतो, आमच्या चारही कुटुंबातील सदस्यांची मनं कातर आणि हळवी झाली होती जेंव्हा त्यांनीगाडयांना कीका मारल्या तेंव्हा. बायको आणि आईबाप यांच्या मनात 'नको ते' विचार येत असतात. माणसाची सहजवृत्ती नेहमी'वाईटाचा' विचार जास्त करत असते. बायको आणि आईबाप जास्त वेदनामय असतात. बरं एकमेकांना सुद्धा सांगता येत नाही. सगळंकसं गुपचूप चाललं असतं - मनातल्या मनात. चवदा दिवस हा फार मोठा कालखंड आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये.
काल आज या चारही 'मुलांचं' खूप कौतुक होत होतं. वाजत गाजत मिरवणूक काढली त्यांच्या मित्रांनी - शॅम्पेनची बाटली सुद्धाफोडायची होती - पण एकजण म्हणाला - प्रायव्हेट फंक्शन मध्ये फोडू. घरच्यांनी 'ओवाळून' फुले उधळून स्वागत केलं. सुखरूप घरीआल्याबद्दल आनंद व्यक्त केला - पण डोळ्यात कडेला पाणी आलं होतं.
एवढ्या गर्दीत माझ्या मनातली वेदना 'हुंकार' देत होती. मोठयाने ओरडत होती - म्हणत होती - आमचं काय? मुलं सुखरूप घरी येतील कीनाही या विचारांनी मन व्याकुळ झालं होतं. आमच्या 'सत्काराचं' काय? पण ढोल ताश्याचा आवाज इतका प्रचंड होता की - आमच्यावेदनेची गर्जना कुणालाच ऐकू येत नव्हती. कोणालाही आमची - बायको आणि आई वडील यांची दखल घ्यावीशी नाही वाटली. अर्थातआम्हीही आनंदात होतो - मुलांना 'ठीकठाक' बघून.
आज वेदना विसावली. तिने मुक्त श्वास घेत स्वतःला मुक्त केले - कारण आज साकेत सुखरूप परत आला. माझा गेली चवदा दिवस'जीव' आढ्याला टांगलेला होता तो आता निर्धास्त झाला .... पुढील धाडस सुरु होण्यापर्यंत. गप्पागप्पात साकेत सांगत होता - 'बाबाआयुष्यात पहिल्यांदा लँड स्लाईड बघितलं. माझ्या डोळ्यासमोर झालं. मी लीड करत असल्याने पुढे होतो ... आणि एक मिनिट अंतर पुढे... रस्ता नाहीसा होत होता.
ती जी कर्नलची बायको सांगत होती ना ते मला पटलं होतं. विक्रम गोखले यांना पटलं की नाही - माहित नाही.
@kingzofroadz
#ride #chaardham #longride #kingzofroadz #september #kedarnath #badrinath
#backpackermankar
#mankar_rang
वेदना ही वेदना च असते - शारिरीक कमी जास्त असू शकते. मानसिक तर प्रत्येकाची वरच्या पातळीची च असते.
ReplyDeletePost a Comment