आज मला माझ्या घरात जागा नव्हती, दिवाळी साजरी होत असूनही. उल्काने 'घरातून जा' असं सुचवलं नसूनही मी घराबाहेर पडलो. कारण तिला तिची space हवी होती - exclusive (
फक्त एका माणसाने किंवा गटाने वापरायची, वाटून न घेण्यासाठी)
गेले आठ दिवसांपासून तयारी चालली होती - जणू काही 'बोलण्याचा' शोध लागला होता. फोनवर फोन. उसंत अशी नाही. काल तरउत्साह शिगेला पोहचला होता. उल्का यजमान झाली होती. आणि येणारे पाहुणे ?! सारडा कन्या शाळा - आठवी अ ( की ढ !? की .. ) मधील मैत्रिणी. दहा पंधराजणी आमच्याकडे येणार होत्या. खूप दिवसांनी, वर्षांनी भेटणार होत्या.
मी त्यांचे फोन ऐकत होतो. फोनवर असं ठरलं की - उद्या इंट्रोडक्शन देतांना माहेरचं नाव आधी सांगायचं आणि मग वैगरे वैगरे. ( च्यायला, नवरा म्हणजे 'वैगरे'?!) एकीला येण्याची खूप इच्छा असूनही तिला प्रापंचिक अडचणींमुळे येता येत नव्हते - म्हणून खंत वजादुखं व्यक्त केले जात होते. एकीला 'काळ काम अन वेग' यांच्या अवघड गणितामुळे जमत नव्हते तर उल्का सुचवते - पाच मिनिटांसाठीतरी ये. ड्रेस कोड आहे का? बहुदा नाही. असं बरंच काही ... तयारी जोरात - पहिलटकरीणेला असतो तसा उत्साह.
लहानपणीच्या मैत्रिणींना भेटण्याची जी 'ओढ' असते ती मला जाणवत होती. (पोरांचं नसतं असं काही !). गप्पांचा 'फड' तर जमणारहोताच पण शाळेच्या वर्गातील 'आरडाओरड' पण होणार हे नक्की. शाळा सोडल्यानंतर पंचेचाळीस / पन्नास वर्षे उलटून गेल्यावर - कोणी आपल्याला 'त्या' नावाने बोलवणार - काय गंम्मत आहे नाही? एका सादेने, ह्या 'मुली' मागे प्रवास करणार. स्मरणरंजनात गुंतणार. अडकणार. खोल प्रवास असतो हा. या डोहात 'बाई, सर आणि त्यांच्या 'खोड्या'. उपहास आणि कौतुक - कॉकटेल. ते दिवस, त्याआठवणी. कदाचित 'सुली', 'उल'ला ( उल्काला ) म्हणेल - मी तुझ्याशी कट्टी घेतली होती याचं मला आजही वाईट वाटतंय. कोणीम्हणेल - आठवतो तुला त्या 'गॅदरिंग' चा दिवस - काय मज्जा आली होती ..... प्रत्येकाचा जीवनपट वेगळा असला तरी 'लहानपण' एकचआहे - पूर्ण निरागस. तेव्हाच्या 'जादूच्या झपक्या', हातातले हात परत एकत्र येतील आणि पुनश्च एकदा 'मिठ्या' घट्ट होतील. एखादीपोर शिट्टी वाजवून 'मुलांना' लाजवेल का ?
Unlimited Dopamine hormones will flow which will promote positive festive feelings, including happiness and pleasure. This “feel-good” hormone, is a neurotransmitter that's an important part of brain's reward system. This is very essential at ‘this’ age.
परत भेटी होतील न होतील, माहित नाही. पण या 'आठवणींच्या जागरणात' नवीन आठवणींची बेरीज होईल. आज वजाबाकीला जागानाही. ज्या मैत्रिणी आपल्याला सोडून गेल्या ... त्यांची किंचित आठवण ... एखादा थेंब .... पार्टी संपेल तेंव्हा 'आठवणींच्या कुप्या' परतबंद होईल - कारण हे सर्व 'वैयक्तिक' आहे - it’s very very personal. उल्काने ठरवलं - काहीतरी स्मरणिका द्यायची. या विषयावरबराच काथ्याकूट झाला, मतांतरे झाली कारण 'गिफ्ट काय द्यायची?' या समस्येत मी हि अडकलो होतो. शेवटी ठरलं - भेट वस्तू 'जिवंत' असली पाहिजे. प्रत्येकीला दोन फुलांची रोपं. जेंव्हा जेंव्हा 'मुली' फुलांकडे बघतील, तेंव्हा तेंव्हा त्यांना 'आजची भेट' आठवेल ..... आणिहाच तर उद्धेश आहे - समृद्ध जगणं, जेव्हढं जमेल तेव्हढं, ज्याला जमेल त्यानं.
*प्रत्येक माणूस - आठवणींचा खंडहर - आठवणी या अवशेषच की.*
मी आता माझ्या 'दहावी अ' च्या पार्टीसाठी आयोजन करतो.
वाह ! छानच अगदी.
ReplyDeleteत्यातलं "रोप" देऊन निरोप घेण्याची संकल्पना तर फारच आवडली.
Post a Comment