*मन वढाय वढाय*
आज सायकलिंगचा मार्ग बदलला. आज गावात गेलो, नव्या स्मार्ट रोडवरून सी बी एस वरून , स्तंभावरून, व्हिक्टोरिया पुलावरूनगोदावरीचे वरून दर्शन घेतले. नंतर काळाराम मंदिराचा बंद दरवाजा बघून रामकुंडावर पोहचलो. पूर पूर्णपणे ओसरला होता आता फक्तपात्रातच पाणी होतं. 'नदीकाठचे चित्र' विहंगम वैगरे असे काही नव्हते. उलट वाईट वाटत होते. मी जगातल्या खूप नद्या पाहिल्या आहे. लोकांनी नद्यांना दिलेली वागणूक थक्क करून सोडणारी आहे. इतर देशांनी अमाप प्रेम दिलं आहे - आपल्या आईला - आपल्या नदीला. नावा नदी सेंट पिटर्सबर्ग, रशिया किंवा डुओरो नदी पोर्टो, पोर्तुगाल पहा - इतिहास उभा आहे. नदीला 'धक्का' लावलेला नाही. अनआपल्या येथे - पात्रात कॉंक्रिट ओतलंय. घाणीचं साम्राज्य. फारशी बसवून विद्रुपीकरण सुरु आहे. भिकाऱ्यांचे जागोजाग अड्डे आहेत.
एवढं सगळं असूनही मी नदीला बघायला महिन्यातून एकदा तरी जातो. मला पाण्याकडे बघायला खूप आवडतं. पाणी वाहतांना जोआवाज येतो तो - एक नितांत सुंदर मेलडी असते. आज मात्र व्हिक्टोरिया पुलाखालून पाणी खूप 'आवाज' करत होतं - जणूकाही नदीचंआक्रंदन सुरु होतं. दहा मिनिटे पुलाखाली बसलो - मन भरून आक्रंदन ऐकलं. मग लक्ष्मण कुंड, रामकुंड, गांधी तलाव बघत बघतनारोशंकराचा घंटा बघितला. आहो आपल्या लोकांनी ती अवाढव्य घंटा सुद्धा बंदिस्त करून टाकली. दहाव्याचे कार्यक्रम मात्र जोरातचालू होते - करोनाची तमा न बाळगता. वरच्या बाजूला कावळे यथावकाश 'घास' घेत होते. त्रास होत असला तरी ... मन वढाय वढायहोतं .. नदीसाठी. रामसेतूची अवस्था तर दयनीय झाली आहे.
*मन वडाय वडाय*
रामसेतूच्या समोर भांडी बाजार आहे. तेथे सकाळी सकाळी भाज्या दिसल्या. घुसलो गल्लीत. बालाजी मंदिराच्या वास्तूत 'राजहंस' नावाचं हॉटेल आहे. त्याचा निम्मा पसारा रस्त्यावर असतो. कढईतील तेल नुकतंच तापलं होतं. वड्यावाल्याने पहिला वडा कढईतटाकण्याची वेळ आणि मी तेथे पोहचण्याची वेळ एक झाली. ते म्हणतात ना 'कावळा बसायला ....'. मी वेटर बाबाला विचारलं - मालकरस्सा तयार झाला का? मालक म्हणतात - नाही अजून. पाच मिनिटे थांबा. मन वडा वडा करत होतं. पाच मिनिटात भाजी घेतली अन'हाटेलात' आलो. टेबलं तेलकट होती. मनात म्हटलं - टेबलं चाटायला थोडं आलो आपण. काही हरकत नाही मानकर. स्वच्छतेचा बाऊकरू नका. मी ऑर्डर न देताच 'वडा-रस्सा' समोर आला, एका प्रश्नाबरोबर. 'पाव देऊ का?' - मी 'नको'! आणि मग 'वड्याचा' समाचारघेण्यास सुरवात केली. रंग रूप चव आकार - ३६० डिग्रीत - आनंदाला उधाण आले होते. डोळे जीभ नाक - तृप्त. अर्धा वडा राहिल्यावरमी मन आणि मान वर केली. इतर लोकांनी 'भजी' घेतली होती. एक 'नटसम्राट' ही दिसला. एकाग्र पणे भजी खात होता. माझंही मन'भजी भजी' करू लागलं. पण .... नको म्हटलं, मनास. उगाच ते कोलेस्टेरेल वाढायला नको. गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून - राजहंस - बघत आहे. काहीही बदल नाही. तेंव्हाचे तरुण वेटर आज म्हातारे मात्र झाले होते. काउंटर एक तरुण मुलगी सांभाळत होती. बहुदापुढच्या पिढीतील ती मालकीण असावी.
*नदीला पाहून अ-प्रसन्न झालेलं मन वडा खाऊन प्रसन्न झालं. नदी आणि राजहंसचा वडा - दोनीही अक्षय.
दिवसाची सुरवात उत्तम झाली. उत्तम फिरणं झालं कि काहीही खाता येतं हे नक्की. फोटो पहा. *
Post a Comment