मी तुम्हांला एक 'खबर' पोहचवतोय. चांगली कि वाईट हे तुम्हीं ठरवा, ब्लॉग वाचल्यावर. आज सकाळी सकाळी सिटी सेंटर मॉल पासूनगोविंद नगरच्या रस्त्यावरून मोर्निंग वॉक घेतांना, वर बघितलं, उभ्या राहिलेल्या आणि होऊ घातलेल्या 'गगनचुंबी' इमारती पाहून मनभरून आले आणि मी दिवसाउजेडी डोळे उघडे ठेऊन नाशिकची मुंबई झाल्याचं कल्पनाचित्र रेखाटू लागलो. पण चालतांना फार काळ वरबघता येत नाही म्हणून समोर बघितलं तर एक लहान मूल नंदिनी नदीत शी शु करून घरात येत होतं - अगदी मंत्र्या संत्र्या सारखं. उद्याचेपुढारी, भाऊ दादा - येथूनच येणार. सु- शिक्षितांना कुठे वेळ आहे, पुढारीपण करायला. फुटपाथवर अलीकडेच 'गृह निर्माण' झालेलंदिसलं. दरवाजे नसल्याने आत राहणाऱ्यांची लोकसंख्या दिसत होती. अंदाजे दहा बारा लहान मुले असावी + सहा सात मोठी माणसं. या१०० फुटी रोडवर दोन्ही बाजुंना फुटपाथ आहे. पण तो वापरात नाही कारण गवत आणि झाडं यांची बेसुमार वाढ. या रोडवर दररोजरिकाम्या दारूच्या बाटल्या आणि फूड पार्सलचा कचरा असतो ( श्रीमंतांची लेकरं असावीत कारण एक एक लिटरच्या महागड्या बाटल्याअसतात आणि बर्गर पिझ्झा यांची रिकामी पाकिटं असतात. बऱ्याचदा 'क्वार्टर' सुद्धा दिसतात ). या मुळे हा होऊ घातलेला फाईव्ह स्टाररोड अतिशय गलिच्छ असतो अन त्यात आता हे 'गृह निर्माण'. या झोपड्यातील लोक 'वर्क फ्रॉम होम' करतात. ते त्यांची दुकानं तेथेचरस्त्यावर मांडतात. ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना बंदी आहे त्या येथे राजरोस विकल्या जातात. रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे - पण कोण फिकीर करतो? मी हे सर्व अडथळे पार पाडत पुढे चौकात गेलो. तेथे भारताच्या लोकसंख्येचे आकडे दाखवणारा बोर्डबघितला. 1,396,997,554 एवढी आपली आता लोकसंख्या आहे. चौकाचं नाव क्युपिड सर्कल आहे. Cupid म्हणजे कामदेव. दहासेकंदात ३ नवी बालके जन्माला आली कारण आता बोर्डवर संख्या होती 1,396,997,557. मला आकडा वाचतांना त्रास झाला कारणआकडा मिलियन बिलियन मध्ये आहे. आपल्याला हजार लाख कोटी समजतात. त्यामुळे आकड्याकडे बघून लोकसंख्या नियंत्रण होईलअसे वाटत नाही. थोडंसं इकडे तिकडे बघितलं तर ट्रॅफिक पोलीस हेल्मेट नाही म्हणून दंड वसूल करत होते. त्यामुळे चौकात सिग्नल चालूअसूनही अनागोंदी माजलेली दिसत होती.
मी यु टर्न घेतला आणि घराकडे निघालो. मनात तोच विचार - नासिक लवकरच मुंबई होणार. अगदी जलद गतीने मुंबई होणार. पाचवर्षात हा रस्ता उंच इमारतींनीं सजलेला असेलच पण बेसुमार घाण आणि गरिबी रस्त्यावर सांडलेली असेल. मनात काही प्रश्न रुंजीघालू लागले. ते असे :
पालक मंत्री आणि पोलिसांनी हेल्मेट वापराच्या बाबतीत जो जुलूम सुरु केला आहे तो थांबवावा. पेट्रोल स्टेशन्स वर जे पोलीस तैनातकेले आहे त्यांना सांगावं की - जा आणि जे २/४ चाकी वाहनं रॉंग साइड ने येतात त्यांना अटक करा आणि एक दिवसाचा तुरुंगवासआणि ५००० दंड ठोका. ह्या अल्पसंख्य २/४ चाकी वाहनांमुळे बहुसंख्य पादचारी, जे जीव मुठीत घेऊन चालतात, ते तरी सुरक्षितराहतील. जे सिग्नल मोडतात त्यांना अजून मोठी शिक्षा करा. पोलिसांनी पेड स्वयंसेवक नेमावे आणि 'आपल्या' स्वतःच्या कामात लक्षघालावे. जरब बसली पाहिजे पोलिसांची.
मुन्सिपाल्टीने सर्व फुटपाथ स्वच्छ करण्याचे मनावर घ्यावे जेणेकरून लोक रस्त्यावरून न चालता फुटपाथवरून चालतील. अनधिकृत 'गृहनिर्माण' ताबडतोब हटले पाहिजे त्यामुळे सुरक्षा निर्माण होईल. रस्त्यावर दुकानं थाटायचा आधी दुकानदाराने दोनदा विचार केला पाहिजे- कायदा काय करील याचा. हल्ली असे 'गृह निर्माण' कुठेही दिसते. आता तर दिवाळी जवळ आली आहे.
पालक मंत्र्याने 'समाजस्वास्थ्याचा' विचार केला पाहिजे. र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेतला पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण या साठीजन जागृती केली पाहिजे - जिथे गरज आहे तिथे. लैंगिक शिक्षणाचा पुरस्कार केला पाहिजे. कंडोमचं वाटप केलं पाहिजे. यामुळं 'समाजस्वस्थ' नक्कीच होईल. 'पण पालक मंत्र्यांना येथे 'मत पेटी' दिसत असेल म्हणून ते काही करत नसतील ' असा विचार मांडला जाईल. पण ते चुकीचं आहे कारण ही रस्त्यावरील लोकांची नावं 'मतदार ' यादीत नसतील. कदाचित म्हणूनच ही 'अनास्था' पालक मंत्र्याची.
मला एक गोष्ट या आयूष्यात समजलेली नाही ती अशी की - ज्या व्यक्तीचं दररोजचं उत्पन्न रुपये २००-३०० च्या वर नाही ती व्यक्ती ३/४मुलांना जन्म देतेच कशी? कपडे नसतातच पण ही मुलं 'उष्ट्यावर' जगतात आणि मोठी होतात. त्या बापाकडे एव्हढीशी सुद्धा बुद्धी नसते? आपल्या डोळ्यासमोर तो दररोज 'मरण' बघत असूनही पाचवं मूल पैदा करतो. हेल्मेट घातली नाही म्हणून 'समुपदेशन' करायचं असंपोलिसांनी आणि मंत्र्यांनी ठरवलं आहे. त्याऐवजी या 'नवऱ्यांचं' समुपदेशन करा. लोकसंख्या 'आवरा'. नाहीतर हीच आजची लहान मुलेउद्या 'समाजस्वास्थ्यास' बाधा आणतील. 'विषमता' जशी 'आणखी' वाढत जाईल तशी तशी 'स्वस्थता' संपत जाईल. जीवन भयावह होतजाणार.
बोलता बोलता नाही, विचार करता करता घरी पोहचलो. हे समजलं कारण शेणाचा वास आणि घाण. माझ्या घराजवळ म्हणजे तिडकेकॉलनीत एक गोठा आहे. शहराच्या मध्य वस्तीत पन्नास जनावरांचा गोठा आहे हे अजूनही मुन्सिपाल्टीच्या ध्यानात आलेलं नाही. नासिक मुन्सिपाल्टी आंधळी आणि बहिरी आहे. रस्त्यावरील म्हशींना टाळत घरी पोहचलो.
नाशिकची मुंबई होणार या विचाराने धडकी भरली. जो प्रकार तिडके कॉलनी गोविंद नगर येथे आहे तोच प्रकार गंगापूर नाक्यावर सुद्धाआहे. *चित्रफीत बघा म्हणजे समस्या कीती मोठी आहे ते समजेल ...*
*The ever increasing gap between haves and have-nots astonishing. But I think, ‘have-nots’ are equally responsible for their ‘have-not-ness’! *
Actually Mumbai khup chhan opportunities denare shahar ahe. Mumbai madhe ghan ahe kinwa kachara ahe he phakta mumbai baherche lok mhantat
ReplyDeleteखरंय. हा अनुभव दिवसेदिवस येतोय. Devlopers हे development without planning करंत सुटलेत....आणि बळी कुणाचा @!
ReplyDeleteजळजळीत सत्य
भस्मासूर, अजुन नेत्यांना अंदाज नाही, अन लोकांना तर नाहीच नाही 😔
ReplyDeleteचीन ने १९७७ साली एक अपत्य कायदा आणला होता अन आपण ५० वर्ष विचारच करतोय
BTW now china is struggling to reverse that.
DeleteExcellent, this is inevitable for any growing city. Infact happening to Nashik pretty late despite being in very close proximity of country's commercial capital. That is because of political will. Now the sufficient amount of land parcels are owned by politicians in Nashik, it will develop at double pace. what is bad is the sustainability. The city needs drivers to sustain. Nashik could have been developed as good educational hub after Pune getting saturated but Shirpur took lead and Nashik lost its charm due to lack of Guardian Minister. You may build cities and sky scrapers but may not be able to create drivers for sustaining growth.
ReplyDeleteकाय लिवलंय राव....
ReplyDeleteसमद्या लोकांच्या मनातलं...
हजारो लोकं हा रस्ता क्रॉस करत असतात.... पण तुम्ही मातुर सगळं छान टिपलंय...
मन कळवळून येतं.... हे कधी बदलणार?
कोण बदलणार?
कोण कुणाला सांगणार?
कसं?
कधी?
कुठं?
OMG...
पण सलाम तुमच्या लिखानाला
कितीही type केलेले stars कमीच आहेत...
पण तरीही 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
हे घ्या...
सर्जेराव पाटील
ऑस्ट्रेलिया हून....
I tried to post my comment in the website but was not successful. Hence conveying it to you directly. I am not sure though if you will find it relevant or not.
ReplyDeleteQUOTE
You have touched very important issue which, to my mind, is only the proverbial “tip of the iceberg”. It is only symptom of deep lying malice in our system of governance. Any discussion on it would open pandora’s box. Hence, I will limit my observations to following lines:
Our country is in dire need of reforms in multiple areas which include among others, political, administrative, judiciary, police administration, education, health, agriculture, industrial etc
Many of these are interrelated while some are mutually exclusive. Interrelated means that you need to address all of them simultaneously in order to get the desired results.
Implementing reforms requires unity in the society & all political parties. The current situation in our country does not look anywhere close to this if one only looks at the ruckus in our parliament. There is no consensus on issues related to national security or foreign policy. Another glaring example is the farmers agitation against the three farm bills in which we see both sides having taken positions which, as per them, are nonnegotiable.
I am not going into the merits or demerits of the farm bill per se, but I am referring to it only to drive my point about having a unity among all ‘stakeholders’ to successfully implement any reform.
I only wish & pray that, not only Nashik, but no city in the country should become like Mumbai.
I also pray that sanity prevails over our political class to go beyond their political ambitions to arrive at a consensus on issues for the larger good of the ‘man on the street’, the Aam Admi (not AAP!!)
UNQUOTE
Rajeeve Mujumdar
Post a Comment