काल नारायण .. आज सदानंद .. उद्या ...


काल म्हणजे दहा सप्टेंबरला नारायण याने 'शुभेच्छांचा आहेरदिला कारण त्या दिवशी माझा वाढदिवस होता१९८९ नंतर आम्ही प्रथमचबोलत होतोसाधारण तीस वर्षांनी बोलत होतोपण खूप काळ वाहून गेल्यावर आपण बोलत होतो असं नाही वाटलंसहज आणि सुलभगेल्या पंचवीस वर्षात 'काय कायझालं हे गप्पांच्या अंती समजलं आणि आम्हीं दोघंही 'सह-समाधानीआहे असं जाणवलं   ( जुन्या ASEA ) च्या आठवणी खोल डोहातून वर आल्या आणि मन प्रसन्न झालं - स्मरणरंजनानेत्याने फोन केला म्हणून हे साध्य झालंत्यालाही चार शब्द व्हाट्स अप च्या गिरणीत टाकता आले असतेपण त्याने फोन केलाका केला असावाबहुदा माझं ८९ नंतर आयुष्यकसं गेलं असावं ह्या बद्दल उत्सुकुताकींवा मानकर बद्दल कुठेतरी काहीतरी वाटत असावे म्हणूनअसोफोनमुळे आम्हीं तीस वर्षे कव्हरझाली , मनास अत्यंत आनंद देऊन गेली


आजही शुभेच्छांचा पूर     ग्रुप वर पाहीलामितभाषी आणि सत्शील सदा आनंदी कस्तुरे माझ्या डोळ्यासमोर आलाबक्षी साहेबांचापि  होता बहुदापटेल साहेबांचा पि  होता आचरा हाही आठवलाशॉर्टहँड ची बुक हातात घेऊन केबिन मध्ये जाणारा कस्तुरेआठवलाग्रुपवर शुभेच्छा टाकणार ... तेवढ्यात 'आतूनप्रश्न आला - मानकर फोन का नाही ? लगेच फोन लावला .... आणि परत तीसवर्षांच्या आठवणींचा 'जागरझालामजा आलीआज कस्तुरे ६८ वर्षे पूर्ण करत आहेनातवंडात 'रममाणझाला आहेनातवंड आहेम्हणून आरोग्य आहे असा नवा फण्डा मला समजलामला 'घरी येम्हणालाबहुदा उद्या सकाळी चहालाच त्याच्याकडे जाईन म्हणतोभेट झाली कि फोटो टाकीन


फोन केल्यामुळे 'आपुलकीऐकता येतेबोलण्यात अतीव आनंद आहेएका बरोबर बोलतांना अनेक चेहरे समोर येतात , त्यांचे स्वभावत्यांच्या गमतीजमती मनात रुंजी घालू लागतातसर्वानांच फोन करणं अशक्य असतं कातर नाहीमनातून कुठेतरी वाटलं पाहिजे - फोन करावा का - भावनांची ओल अनुभवावी काउत्तर हो असेल तर .... नाहीतर चार शब्द द्या पाठवून ... पोहचतील का ? कदाचित ! 


काळ नावाची एक गोगलगाय आपल्याला स्वतःच्या पाठीवर बसवून सावकाश पुढे सरकत असतेआपण पुढे बघण्यात हरवलेलेअसताना भूतकाळात बघावं , गत काळातील आयुष्यलोकघटना ह्याकडे बघावं  आणि मग 'आजसंपवून पुढे सरकावंदिवसभरातकोणालाही एक तरी फोन करावा


आज ABB चा भाव २००० पर्यंत जाऊन पोहचला आहे१९७० च्या दशकात तो २० रुपये होताकालाय तस्मै नमः

0/Post a Comment/Comments