६३ ची सुरवात - अजेन्डा आहे


 *६२ ची सुरवात - अजेन्डा हवाच हवा! *

काल बाप्पांचं आगमन असल्याने यांत्रिक पद्धतीने वाढदिवस साजरा झाला नाहीकेक नाही की हैप्पी बर्थडेची इंग्लिश धून नाहीअनाहतादीपाली आणि उल्का यांनी औक्षण केलं आणि नंतर बाप्पांची आरती झालीसर्व काही सात्विकमला बरं वाटलंहल्लीवाढदिवसात नाही मन रमत - मी कितीही उल्हसित आणि सकारात्मक असलो तरीमला तो 'तोचतोचपणानाही आवडतवर्षानी येणारअसला तरीसगळं कसं उत्स्फुर्त असलं पाहिजेमाहिती आहे की ते शक्य नाही


लोक बाप्पांमध्ये बिझी असल्याने शुभेच्छासुद्धा कमी आल्यासाधारण साडेपाचशे मित्रांनी व्हाट्सअप आणि फेसबुकचा आधार घेतलाआणि क्षणभर माझ्यासाठी 'चिंतनकेलंपुरेसं आहे तेव्हढंपण ...... रात्री दहा वाजता मीही एक पोस्ट टाकली आणि 'थँक्सम्हणालो. (मनात विचार आला - अरे काय चाललंय हे ? कुठे चाललो आहोत आपणजिवंतपणा हरवला काहो ?) 


पंधरा वीस मित्रांनी आणि नातेवाईकांनी फोन केलेत्यांच्या बरोबर केलेला संवाद मात्र मनास भावलाआणि मी खूप खूप थँक्यूम्हणालोमजा आली कातर 'होकारण संवादात तोचतोचपणा नव्हताखूप नाविण्य होतेविषय वेगळे होतेओलावा होता. ' तू कसाआहे ? ' हे जाणून घ्यायची इच्छा होतीखरं सांगतो - याचं लोकांनी खऱ्या अर्थाने माझ्या 'वाढीचेस्वागत केलेखूप दिवसांनी बोललं कीबरं वाटतंमुख्य म्हणजे बोललं की बरं वाटतं


*मला तर असं वाटायला लागलं - दोन वाढदिवसांच्या तारखांमध्ये एखादा 'दिनांक पकडावाआणि फोन उचलावाआणि सांगावं - 'मित्रा तुझी आज आठवण आली म्हणून फोन करतोयकसा आहेस?'. मग प्रदीर्घ गप्पा माराव्या - अघळपघळकिंचित चावणटजुन्याआठवणी काढत - नवीन काही सांगत.' मी हा प्रयोग नेहमी करतो आणि मित्रांच्या मनात 'घरकरतो - ३६४ दिवसप्रत्येक मित्राचीखासियत माझ्या मनात रुजलेली आहेत्या 'रुजवातीलामी फोन करून खत पाणी घालतो. And I call this as ‘sustainable relationship’. मंडळी आपल्या कृतीनं 'संबंधनिरपेक्ष पद्धतीने वाढला पाहिजे. *


झोप लागत नव्हती म्हणून विचार करत होतो पडलो होतोजुनी बकेट लिस्ट चेक केलीजे पॉईंट्स बाकी राहिले होते ते उडवून टाकलेम्हटलं जुनी लिस्टच डिलीट करावी आणि नवी तयार करावीसाफ सफाई फार महत्वाची असतेवेळ निघून गेली कि हातात काही नाहीअसं व्हायला नको. 'आयटेमकमी केलेले बरेकाळ काम वेग लक्षात ठेऊन गणित बसवावंमी पाच दहा वर्षात मरणार आहे याची नोंदघेणं फार महत्वाचं


मागच्या वर्षी ठरवलं होतं की 'दुसरंपुस्तक - 'Exit-Entry : Golden Prison of Saudi ' लिहायला घ्यावंपण नाही जमलंचार पाचपुस्तकं लिहून होतील इतका ऐवज डोक्यात आहेतो कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करावा असं परत योजतोयगंमत म्हंजे पुस्तकांचीटायटल्स सुद्धा ठरवली. 'आफ्रिका - पुनश्च एकदा', 'Textures of East and West’,  ‘Iranian Odyssey’ etc. This task will occupy me for 5 years. Wow 🤩बस्सरितं व्हायचं


Second top most item is learning ‘synthesizer’. खरं तर मला पेटी शिकायला आवडेलपण आठ वर्षांपासून अडगळीत पडलेलाकॅसिओ वाट बघतोय ना.


तिसरा आयटम फारच मजेशीर आहे. Youtube चॅनल तयार केले त्यावर बॅकपॅकिंग विषयी प्रबोधन करायचेप्रवास करतांना. VDO पोस्ट करायचे आणि जुन्या ट्रिप विषयी बोलायचेजमलं तर पॉडकास्ट करायची माहितीलोकांनी खूप फिरावं असं मला वाटतं


या तीनही गोष्टी आव्हानात्मक आहेभेजा फ्राय करणाऱ्या आहे तितक्याच आनंददायी सुद्धा असतील


चौथा आयटम .... आत्ता नाही सांगत


सकाळ झालीनवे आयुष्यनवी स्वप्नेमी एकदम फ्रेश झालोमाणसाला जगण्यासाठी अजेन्डा हवा असतो हे नक्कीतो नसेल तर ' भयानक पोकळी ' निर्माण होते असं मला वाटतं ऍक्टिव्हिटी keeps you busy. एक नवा प्रवास सुरु झालाय. New possibilities are acting as booster. कुठेतरी देव आहे असं मला अचानक वाटलंमग माझ्या मित्राचं विधान मला तितक्याच प्रकर्षाने आठवलं - आपलेविचार हेच आपले देव आहेआज सकाळी मी Zero corrupt आहेएकदम 'शुद्ध - pure ' आहेखूप कामं बाकी आहे असं वाटतंयखूपकरण्याजोगं आहे असंही वाटतंयहे जे 'वाटणंआहे ते महत्वाचंतेच 'जगणंहोय


स्वत्यस्तु ते कुशल्मस्तु चिरयुरस्तु

0/Post a Comment/Comments