माझा कलाकार मित्र किशोर सोनावणे सटाण्यापासून जवळ असलेल्या गावात राहतो - अजमेर सौंदाणे. मी त्याला आज तिसऱ्यांदा भेटायला चाललो आहे. बरोबर आहे - उल्का, संजीवनी आणि शेखर. माझ्या प्रत्येक भेटीत मी किशोरला बरोबर घेऊन देवळण्याला घेऊन जातो - कारण ? किशोरचा ह्या मंदिराचा खूप अभ्यास आहे. त्याने माहिती दिली कि मंदिर 'समजून उमजून बघता 'येते. आजही त्याने खूप माहिती दिली. माझ्याकरिता हे मंदिर 'महाराष्ट्राचे खजुराहो' आहे.
देवळाणे हे गाव सटाण्यापासून १६ कि.मी. अंतरावर दोध्याड नदीच्या तिरावर निसर्गाच्या सात्रिध्यात गावतळयाच्या किना-यावर प्राचीन जोगेश्वरी शिवमंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत आहे. खानदेशच्या या गावात बाराव्या शतकातले एक सुंदर मंदिर आहे. इ.स. ७८५ ते ८१० या काळात देवळाणे येथे कामदेव जोगेश्वराचे मंदिर बांधले गेले. खजुराहोच्या मैथुनशिल्पांप्रमाणेच इथे मैथुनशिल्पे आहेत. हेमाडपंथी बांधणीचे हे पुर्वाभिमुख मंदिर शंकराचे असुन या मंदिराला "जोगेश्वर कामदेव मंदिर" म्हणून ओळखले जाते. दोधेश्वरहून येणारी दोध्याड नदी व ओढा या जलप्रवाहांच्या संगमावर हे देखणे शिल्पमंदिर साकारले आहे. १३ व्या शतकतील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली.
किशोरचे अभ्यासपूर्ण विवेचन मी नेहमी थक्क होतो. आजही झालो. जमलं तर भेट द्या.
Good work done
ReplyDeletePost a Comment