आज अतुल समोर येणार आहे आणि म्हणून मी नाटक कधी 'एकदाचं' सुरु होतंय याची वाट बघतोय. कारण त्याला नट म्हणूनपहिल्यांदा बघणार आहे. पहिली आणि तिसऱ्या घंटेमध्ये जे विचार आन्दोलनं करून गेले ते ...
कालच अतुल 'लोकसत्ता' मध्ये भेटला होता - पुरुष हृदय बाई - या सदरात. काहीतरी वेगळं आणि पुरुषांना विचार करण्यास भागपाडणारं लिहिलंय. पुरुष आणि स्त्री या लिंगभेदाच्या पलीकडे होऊन 'निखळ माणूस' होणं हे महत्वाचं आणि तसं होता येतं - या वरचाउहापोह मस्त. लिहिता लिहिता एक सुंदर पुस्तकही सुचवलं - my body is mine हे. लेखाच्या शेवटी 'अतुल' निरपुरुष कसा झाला हेसांगितलं - केवळ 'अतुलनीय'.
त्या आधी अतुल मला कालिदास नाट्यमंदिरात भेटला होता. दिसला होता असं म्हणणं जास्त योग्य. 'समाजस्वास्थ्य' चा प्रयोग होता. अन प्रयोग सुरु होण्या आधी गिरीश आणि अतुल स्टेजच्या खाली उभे होते - प्रेक्षकांना काही सांगण्यासाठी. अतुलने दोन मिनिटातनाटकाविषयी काही सांगितले तितक्यात एका उत्साही रसिकाने अतुलच्या सर्जनशीलतेविषयी प्रश्न विचारला आणि नाटकातून काहीमेसेज देता येतो का? अशी पृच्छा केली. त्यावर अतुल म्हणाला, 'मी मनात येईल ते करून मोकळा होतो. सर्जनशीलतेच्या प्रक्रियेकडेविशेष लक्ष नसतं. खरंतर हे सहज घडून जातं. आणि मेसेज वैगरेंच्या भानगडीत मी पडत नाही. नाटक मस्त एन्जॉय करायचं. त्यानेसहेतुक गिरीशकडे बघितलं अन नजरेने विचारलं की 'तुला काही सांगायचं आहे'. गिरीश मानेनंच 'नाही' म्हणाला. अतुलनेसांगितल्याप्रमाणे गिरीशने 'भूमिका'* मस्त 'उठवली' - अतुल 'दिग्दर्शक' म्हणून अतुलनीय ..
मकरंद साठे यांनी लिहिलेले ‘सूर्य पाहिलेला माणूस' हे बहुदा डॉक्टर लागू यांचं शेवटचं नाटक. अत्यंत उतुंग. हे नाटक त्यांचं सर्वात जास्तआवडतं - असं डॉक्टर म्हणाले होते. बहुदा मतकरी मुलाखत घेत होते. 'चौकातील विद्वानाची' कथा अप्रतिम 'मांडली' आहे अतुलने - दिग्दर्शन भन्नाट. मी नेहमी नाटकाला 'सामोरं' जातांना रिक्त मनाने जातो. लिहिलंय कोणी? दिग्दर्शक कोण? कथा सूत्र काय? याविषयीखूप माहिती घेत नाही. उगाचच पूर्वग्रह नको. आणि अपेक्षाभंगाचं दुःख नको. नाटक पाहिल्यावर भारावलो - तत्कालीन आणि आत्ताचीपरिस्थिती यात काहीच फरक नाही? असं जाणवलं. या नाटकात 'डारेक्टर' चं अस्तित्व गच्च भरलंय. नंतर लेखक आणि नंतर नट. केवळअतुलनीय.
अतुल पेठे हा नाट्यधर्मी आहे. हाडाचा प्रायोगिक. अस्वस्थ. नाटकातून व्यक्त होणारा आणि स्वतःबरोबर प्रेक्षकांना देखील अस्वस्थकरणारा. म्हणून तो मला आवडतो - पुण्याचा पेठा ! कोणीतरी कानात सांगितलं - अरे तो नाशिकचा आहे ...
तिसरी घंटा झाली. मनातली आंदोलनं आवरती घेतली आणि पुनश्च एकदा रिक्त मनानं ....शब्दांची रोजनिशी - नाटक बघायला मांडीघालून बसलो. इप्टा आणि नाटकघर सादर करत आहे ......
--------------------------------
*समाजस्वास्थ्य या नाटकात लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध, व्यभिचार या विषयांवर लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, संततिनियमनाचा प्रसारस्वतःच्या घरापासून करणाऱ्या, त्याविषयी विविध प्रयोग करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लिलतेचा आरोप ठेवूनगुदरलेल्या तीन खटल्यांची प्रकरणं दिसतात. त्यातले दोन खटले ते हरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे मातब्बर वकिल दिमतीलाअसूनही हरतात. तिसऱ्या खटल्यातून तांत्रिक मुद्द्यावर कसेबसे सुटतात. आणि तरीही त्यांच्यावर चौथा खटला गुदरला जातोच. पणसुदैवाने वा दुर्दैवाने रघुनाथराव तेव्हा हयात नसतात. इतकं मोठं काम करणारा माणूस निधन पावला हे सरकारच्या गावीही नसतं. संस्कृतीरक्षक मात्र जिवंतच असतात आणि राहतात.
Post a Comment