मनातील विकार बाहेर ठेऊन मंदिरात प्रवेश करावा अशी अपेक्षा असते. म्हणूनच कदाचित हे शिल्पे रेखाटली असतील.
या शिल्पांसाठी वापरलेला दगड बाजूच्या डोंगरातील आहे. मंदिर बहुदा अपूर्ण आहे. जेथे दगड आणून त्यावर काम केलं जाई ती जागाआणि अर्धवट शिल्पे, खांब अजूनही बघायला मिळतात.
महाराष्ट्राच्या खजुराहो अशी पदवी सार्थ करणार्या या मंदिरातून पाय निघत नव्ह्ते. मंदिर डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोनतासाचा अवधी असायला हवा. कॅमेर्याच्या बटनावरुन बोट खाली यायला तयार नव्हते. कुठल्याही प्राचीन, ऐतिहासिक किंवा प्रवासीलोकांनी भेट द्यावी अशा स्थळाला भेट देताना व्यावसायिक गाईड असेल तर आपली भेट meaningful होते . किशोरला मी गाईडचमानतो. ईतक्या आडगावात शिल्पसमृध्द असा खजिना लपलेला असेल याची आधी जरासुध्दा कल्पना नव्हती. सातवाहनांचा प्राचीनठेवा जपणार्या या मरहट्ट भुमीत अजूनही छोट्या छोट्या गावातून असा किती खजिना लपलेला आहे कोण जाणे? त्याला हवी ती शोधकदृष्टी आणि यथार्थ शब्दात सामान्यापर्यंत पोहचवण्याची ताकद.
Very nice
ReplyDeleteFantastic...where exactly is this please ?
ReplyDeleteNear Satana. Place is DEVLANE
DeletePost a Comment